बीड : मंत्री छगन भुजबळ यांना ज्या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन धमकी देण्यात आली, त्याच मोबाईल क्रमांकावरुन आता मंत्री धनंजय मुंडे यांना धमकी देण्यात आली आहे मुंडे यांच्या परळीतील संपर्क कार्यालयात सोमवारी सायंकाळी फोन करुन ५० लाखांची मागणी करणारा फोन आला होता. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी या व्यक्तीने दिली होती.
मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मीक कराड यांनी हा फोन उचलला होता, त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करुन नंबर ट्रेस केला असता हा क्रमांक रायगड जिल्ह्यातील महाड येथील असल्याचे समोर आले आहे,
आरोपीला ताब्यात घेण्यासाठी टीम रवाना केली असल्याने परळी पोलिसांनी सांगितले
दरम्यान सदरील आरोपाला मंत्री छगन भुजबळ यांना धमकी दिल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले आहे. तर पुणे पोलिसांकडून या आरोपीला ताब्यात घेण्याबाबत परळी पोलिसांकडून कार्यवाही केली जात असल्याचे परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले