बीड : आज गुरु पौर्णिमा आणि त्यानिमित्ताने गुरूंचे आशीर्वाद मार्गदर्शन शिष्य घेत असतात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं गुरू शिष्याच नातं अतूट असतं शिक्षकांनी दिलेलं ज्ञानार्जन करण्यासाठी विद्यार्थी उत्साही असतात आणि त्यातून ते घडत असतात.
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी बीडमधून धक्कादायक आणि वेदनादायक बातमी समोर आली आज गुरुपौर्णिमा आणि गुरुजींचं अपघाती निधन झाल्याने विद्यार्थी, शाळा, गाव, परिसर आणि बीड जिल्हा हळहळला आहे.
बीड येथून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शाळेसाठी निघालेल्या शिक्षकांच्या दुचाकीला मद्यधुंद असलेल्या कार चालकांने जोराची धाक दिली आणि या भीषण अपघातात शिरूर कासार येथील कालीकादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.अंकुश गव्हाणे व प्रा.शहादेव डोंगर सर यांचे दुर्देवी निधन झाले. ही घटना मन सुन्न करणारी आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला.
हे दोनीही शिक्षक माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेवर नोकरीला होते दरम्यान निधन झालेले दोनीही शिक्षक हे आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे होते आशा अपघाती निधनाने आम्ही अत्यंत दुःखी असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं ट्विट डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केलं आहे.