बीड : शहरातील पंढरी रेसिडेंसी परिसरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्या तीन दिवसांपासून ऐका ३० वर्षीय इसमाचा मृतदेह लटकून असल्याची घटना उघडकीस आली आहे, घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदरील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते, राहुल नंन्नवरे वय ३० वर्षे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाईस सुरुवात केली आहे, दरम्यान सदरील व्यक्तीने का आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजेले नाही.