बीड : शहरात बंजारा समाजाकरीता सामाजिक सभागृहासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बीड जिल्ह्यात बंजारा समाजाची लोकसंख्या दिड ते दोन लाखाच्या आसपास आहे. बीड शहरात देखील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. हा समाज नोकरीच्या आणि काम धंद्याच्या निमित्ताने स्थायिक झालेला आहे. या समाजाचे शहरात विविध सामाजिक कार्यक्रम होत असतात. मात्र या समाजाला कार्यक्रमासाठी सार्वजनिक ठिकाणी कोणतीही जागा नाही. त्यामुळे बंजारा समाजाला सार्वजनिक ठिकाणी सामाजिक सभागृह असणे गरजेचे आहे. याकरिता सामाजिक सभागृहासाठी शासकीय जागा मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या वतीने १०० × ५० चा भूखंड उपलब्ध करून देण्यात यावी यामागणीसाठी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या वातीने बीड च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना निवेदन दिले.
यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याशी जागेच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात उपलब्ध असलेल्या जागेची माहिती घेऊन बंजारा समाजाकरिता सामाजिक सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देऊ असे सांगितले. यावेळी वसंतराव नाईक कर्मचारी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, मजूर फेडरेशनचे संचालक अंकुश राठोड, बंजारा क्रांती दल युवा प्रदेशाध्यक्ष भूषण पवार, पत्रकार नितीन चव्हाण, प्रा.राजेशकुमार राठोड, बाबासाहेब चव्हाण, सचिन पवार, डॉ.आबासाहेब राठोड, प्रा.आसाराम चव्हाण, विष्णू राठोड, श्रीमंत चव्हाण, प्रकाश राठोड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.