बीडमध्ये दोनीही शिवसेनेच्या नेत्यांचा जन्मदि ऐका महिन्यात आणि त्याहून आधीक योगायोग म्हणजे एका जिल्हा प्रमुखाची तारीख ४ जुन तर दुसऱ्या जिल्हा प्रमुखाची तारीख ५ जून या निमित्ताने ते दोघेही होर्डिंग्ज च्या माध्यमातून समोरासमोर आले आहेत.
म्हणजे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे तर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप अनिल जागताप यांचा जन्मदिन ५ जून तर कुंडलिक खांडे यांचा जन्मदिन ५ जून रोजी होता हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहे, मात्र जन्मदिनानिमित्त बीड शहरात जे होर्डिंग्ज लागले आहेत ते खूप काही सांगून जात आहेत.जीथे खांडे यांचं होर्डिंग आहे तिथेच जगताप याजचंही होर्डिंग आहे म्हणजे दोघंही एकमेकांची ताकत होर्डिंग्ज च्या माध्यमातून दाखवत आहेत. म्हणजे जिथे तुम्ही तिथे आम्ही कुठेही कमी नाहीत असं.
हा झाला होर्डिंग्जचा विषय आता या होर्डिंग्ज मध्ये आणखी काय आहे तर त्यावर असलेला मचकूर म्हणजे दोघांच्या पोस्टरवर भावी आमदार असं लिहिलेलं आहे म्हणजे दोघानाही आगामी विधानसभा २०२४ ची निवडणूक लढवायची आहे हे निश्चित आहे.
आता निवडणूक लढवायची म्हंटलं तर त्यासाठी तुम्हाला पक्षाची उमेदवारी आवश्यक आहे, तस निवडणूक लढवण्यासाठी कोणत्या पक्षाची गरज नसते तेव्हा तुम्ही अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकता मात्र तुम्ही पक्षात असूनही त्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली नाही आणि तुम्हाला निवडणूक लढवायची आहे तर अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढवू शकता.
मूळ मुद्दा आहे पक्षाची उमेदवारी मिळण्यावर त्यामुळे आपण बीडमधील राजकारणाच्या गणितावर प्रकाश टाकू म्हणजे आपण तर्क लावू की कोणाला उमेदवारी मिळू शकते शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या त्या पक्षाचा निर्णय असतो त्यामुळे आपण त्या खोलात जायची गरज नाही असं मला वाटतं.
आता बीडमध्ये मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्र निवडणूक लढले होते आणि शिवसेना भाजप एकत्र होते त्या काळात बीडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवाच्या युती ची जागा राष्ट्रवादीकडे होती आता युतीत तुटातुट झाली आहे आता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन जण महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून बीडची जागा शिवसेनेला घ्या अशी मागणी केली गेली असून ती जागा अनिल जगताप यांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे शिवाय बीड व्यतिरिक्त ईतर दुसरी जागा राष्ट्रवादी ला देऊन बीडची जागा शिवसेनेला दिली जाणार असं शिवसेना उबाठा राष्ट्रवादीच ठरलं असल्याचं बोललं जातं आहे म्हणून अनिल जगताप यांच्या होर्डिंग्ज वर भावी आमदार असं लिहिण्यात आलं आहे.
आता भावी आमदार हे कुंडलिक खांडे यांच्या होर्डिंग्ज वर सुद्धा लिहिलं आहे ते शक्य आहे का? हे आपण पाहू.
आता भाजपा आणि शिंदे गट हे सोबत निवडणूक लढवणार आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे आता युती झालीय तर जागा ह्या वाटून घ्याव्याच लागतील जेव्हा २०१९ साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सोबत निवडणूक लढले तेव्हा बीडची जागा ही शिवसेनेला देण्यात आली होती त्यामुळे बीडच्या जागेवर शिसवेना भाजपाच्या युती धर्मानुसार शिवसेनेचा अधिकार आहे अर्थात शिंदे गटाचा ती जागा आत्ताचे कुंडलिक खांडे यांना मिळाली पाहिजे.
मात्र बीडमधून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र मस्के हे सुद्धा २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला फार आधीपासून लागलेले आहेत हे ही विसरता येणार नाही, मध्यंतरी चित्र वाघ जेव्हा बीडच्या दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा त्यांनी राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी भावी आमदार म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या हे मी माझ्या कानाने ऐकले आहे.
आता भारतीय जनता पार्टी ही जागा वाटपात शिंदे गटासाठी किती अनुकूल आहे हे येणाऱ्या काळात कळेलच कारण खुद्द एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेच्या खासदारकीच्या जागेवर भाजपा दावा करत आहे शिवाय भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ लोकांनी छातीठोकपणे सांगितले आहे की राजकारणात भारतीय जनता पार्टी हाच एकमेव पक्ष राहील बाकी कोणी नसेल फक्त शिंदे शिवसेना आमच्या सोबत राहील असं अजिबात त्यांनी म्हंटलेलं नाही जर भाजपा एकनाथ शिंदेच्या पुत्राच्या जागेवर दावा करू शकते तर बीडचे कुंडलिक खांडे काहीच नाही असं मला वाटतं
त्यामुळे बीडची जागा शिंदे गटाला म्हणजे कुंडलिक खांडे यांना मिळण फार कठीण आहे शेवटी पुन्हा तेच सांगेल की उमेदवारी देण्याचा अधिकार आणि निर्णय त्या-त्या पक्षाला असतो त्यात आपल्याला काहीही करता येत नसतं, मात्र बीडचा भावी आमदार कोण हे येणार काळ ठरवेल एवढंच.