औरंगाबाद : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, तपासकामी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पोलीस भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मुंबई हुन आलेल्या या पथकावर गावातील ३० ते ३५ लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्यांसह कुऱ्हाडीने हल्ला चढवल्याने खळबळ उडाली आहे.
मागील ७ मे रोजी झालेल्या पोलीस भरती घोटाळ्यातील संशयित आरोपींच्या चौकशीसाठी हे पथक आलं होतं आणि ते संशयित सुद्धा गावातील जमावाने पळवून लावल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद चितळकर यांनी वैजापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सद्या ते गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत आहे. दरम्यान पोलीस भरती प्रकरणाचा तपास करत असताना ते आपल्या पथकासह छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील संजरपुरवाडी येथे जनकसिंह सिसोदे आणि संतोष गुसिंगे या दोन संशयित आरोपींच्या चौकशीसाठी आले होते.
यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस देखील होते. गावात गेल्यावर आरोपींच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करत जमाव जमा केला. यावेळी ३० ते ३५ लोकं लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाड घेऊन जमा झाले. या जमवाकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली,असून जमावातील एकाने हातातील कुऱ्हाड घेऊन थेट पोलीस कर्मचारी विनोद चितळकर यांच्या डोक्यावर वार केला. मात्र त्यांनी वेळीच स्वतःचं बचाव करत वार चुकवल्याने मोठं अनर्थ टळला. पण याचवेळी त्यांच्या ओठाला कुऱ्हाडीचा दांडा लागला आहे, असून ते जखमी पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते का गप्प आहेत? घोटाळेबाज नेत्याचे जवळचे आहेत का? का त्यांच्या मदतीने या सगळ्या गोष्टी चालतात? याचं उत्तर नेत्यांनी द्यावं.