बीड : तालुक्यातील सिंदफना नदीपात्रातून गेल्या वर्षभरापासून बेकायदेशीर,बेसुमार वाळू उपसा केला जातोय तालुक्यातील नाथापूर, रंजेगाव, कुक्कडगाव, राक्षस भुवन, भाटसांगवी या सर्व ठिकाणाहून दिवसाढवळ्या वाळू उपसा केला जातोय मात्र महसूल प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
वरील सर्व ठिकाणी हजारो ब्रास वाळू साठा पडून आहे सुरक्षित ठिकाणी काढून ठेवलेला आहे असे असताना बीड महसूल विभाग कुठलीही कारवाई करत नाही आत्तापर्यंत बीड महसूल विभागाने एकही ब्रास वाळू साठा जप्त केलेला नाही याशिवाय लाखो करोडोंचा माल वाळू तस्करांनी विकून खाल्ला मात्र बीड महसूल विभागाच्या तिजोरीमध्ये खडखडाट पाहायला मिळतोय ही कोणाची मेहरबानी आहे याचे उत्तर बीड तहसीलदार सुहास हजारे यांनी दिलं पाहिजे.
तहसीलदार सुहास हजारे थातूरमातूर कारवाई करून परत येतात कारवाई करण्यासाठी पाठवलेले कर्मचारी अधिकारी वाळूसाठा तिथेच पसरवून येतात वाळू तस्कर पुन्हा ते गोळा करून तीच वाळू विकतात जप्त केलेला वाळूसाठा घेऊन यायचा असतो किंवा तेथील पोलीस पाटलाच्या ताब्यामध्ये द्यायचा असतो मात्र सुहास हजारे चाणक्य बुद्धीने तो साठा तिथेच पसरवतात आणि वाळू तस्कर पुन्हा तो साठा गोळा करून विकतात म्हणजेच ही वाळू तस्करांना दिलेली सूट म्हणावी लागेल.
बीड महसूल विभागाचे तलाठी मंडळ अधिकारी एवढेच नाही तर तहसीलदारांपर्यंत वाळू तस्करांचे हाप्ते असल्याची चर्चा सिंदफना नदीपात्रामध्ये आहे तेथील नागरिकांमध्ये आहे आणि शिवाय अशा प्रकारचे अवैध धंदे शासकीय अधिकाऱ्यांच्या मेहरबानी शिवाय चालू शकत नाहीत हे जगजाहीर आहे.
जिल्ह्याचे बॉस असलेले जिल्हाधिकारी यांचं काम आहे की कोणत्या विभागांमध्ये कोणता अधिकारी आहे? त्याच्या विभागातील त्याचं काम काय आहे? तो काम कायदेशीर पद्धतीने वेळेवर करतोय की नाही याची देखरेख करणे जिल्हाधिकाऱ्यांच काम आहे मात्र जिल्हा अधिकारी कोणतं काम करतात हे सामान्य जनतेला अद्याप पर्यंत दिसून आलेलं नाही.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांचे भाषण फक्त वायरल होतात कारवाई मात्र शून्य असल्याचं दिसून येत आहे एकीकडे दीपा मुदळ-मुंडे यांची बीड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आणि बीड करांना वाटलं की आता बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त होईल अवैध धंदे मुक्त होईल मात्र बीडकरांची घोर निराशा झाली असल्याचे चित्र आहे कारण एकही खोड मोडण्यासरखी कारवाई जिल्हाधिकारी दीपा मुदोळ-मुंडे यांनी केलेली नाही जिल्ह्यामध्ये अवैध धंते बोकाळले आहेत.
जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे चोऱ्या डकैती होत आहेत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केल्याचं अद्याप पर्यंत समोर आलेलं नाही त्यामुळे गुन्हेगार सुद्धा निर्भय झाले आहेत, जोमानं गुन्हे करत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे फक्त भाषण ठोकतात कारवाई मात्र शून्य असल्याचा दिसून येत आहे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे खरंच कार्यक्षम अधिकारी आहेत का असा प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे.