मुंबई : मागील आठ नऊ महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारण फार ढवळून निघालेला आहे भारतीय जनता पार्टी (bjp) शिवसेना (shivsena) यांची काडीमोड झाली आणि महाराष्ट्राला ग्रहण लागल. तर शिवसेना तर शिवसेना फोडून एकनाथ शिंदे ( eknath shinde ) यांनी ४० जणांचा गट घेऊन शिवसेने बाहेरचा रास्ता धरला आणि भारतीय जनता पार्टी सोबत सरकार स्थापन केल.
सरकार स्थापन होऊन सात-आठ महिने उलटून गेलेत जनहिताचे काय निर्णय आहेत? मंत्रिमंडळ स्थापनेचे काय? चार चार जिल्ह्याचा कारभार एकाच व्यक्तीकडे तर दुसरीकडे राज्यातील शेतकरी आसमानी संकटांना तोड देता देता हैराण आहे, राज्यातील बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, उद्योगधंदे या सगळ्या समस्या आ वासून उभ्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी खुर्चीसाठी एकमेकांवर कुरघोडी करत आहेत हे मोठं दुर्दैव आहे.
अलीकडच्या काळामध्ये एकनाथ शिंदे भारतीय जनता (bhartiya janata party) पार्टी सोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले मात्र एकनाथ शिंदे आता भारतीय जनता पार्टीला परवडणासे झालेत त्यामुळे आता ते त्यांना नको आहेत, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी छोट्या मोठ्या पक्षांना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे किंबहुना तशा प्रकारचं कार्य सुरू झाले आहे असे दिसून येत आहे.
आता भारतीय जनता पार्टीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडी ( mahavikas aaghadi ) स्थापन करण्यात आली आणि त्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीला आता सत्य बाहेर ठेवण्याचा ठरवलंय त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा (vanchit bahujan aghadi ) ही वाटा आहे मागच्या काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर यांनी युती केलेली आहे.
तर आजच्या १ मे रोजी वंचित चे बाळासाहेब आंबेडकर ( balasaheb ambedkar ) आणि छत्रपती संभाजी राजे यांच्यामध्ये अधिक काळ चर्चा झाली आणि महाराष्ट्रातील ( maharashtra police ) सध्याच्या राजकीय परीस्थितीवर ही चर्चा झाली असल्याचे स्वतः संभाजी राजे यांनी स्वीट करून सांगितलं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संभाजी राजे यांची स्वराज्य संघटना बाळासाहेब आंबेडकरांची वंचित हे एकत्र एकत्र येऊन महाविकास आघाडीत जातील आणि भारतीय जनता पार्टीला कसं सत्तेतून खाली उतरवता येईल यासाठी पुढील रणनीती आखली जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.