बीड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ईतिहास घडला आहे, काका जयदत्त क्षीरसागर यांच्या ४० वर्षाच्या सत्येला पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुरंग लावत बाजार समिती ताब्यात घेतली आहे.
गेली ४० वर्ष ही सत्ता जयदत्त क्षिरसागर यांच्याकडे होती या बाजार समितीवर आजपर्यंत कोणीही ताबा मिळवू शकले नाही मात्र २०२३ च्या या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी सत्ता काढून घेण्यात पुतण्याला यश आले आहे.
कसे झाले शक्य….?
बाजार समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, शेतकरी विकास समिती, या सर्वानी मिळून जयदत्त क्षीरसागर यांची सत्ता काढून घेण्यासाठी एकत्र मोठं बांधली होती आणि या सर्वानी ते करून दाखवले आहे बीड बाजार समितीच्या 1८ जागांपैकी १५ जागा निवडून आणण्यात शेतकरी परिवर्तन महाआघाडी यश आलं आहे.
दरम्यान शेतकरी परिवर्तन महा आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पहायला मिळाले आहे.