मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सात ते आठ महिन्यापासून राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत, अजित पवार ४० आमदार घेऊन bjp मध्ये जाणार आशा बातम्या येत होत्या त्यांनतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलून ह्या बातम्या तथ्यहीन आहेत असं जरी सांगितले असले तरी मागच्या तीन दिवसांपासून राज्यात ज्या वेगवान घडामोडी घडत आहेत त्यावरुन हे स्पष्ट होत आहे की राज्यात काहीतरी नवीन घडणार आहे.
काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जपान दौऱ्यावर होते ते तीन दिवसानंतर परत येणार होते मात्र ते अगोदरच राज्यात तातडीने दाखल झाले आहेत, तर दुरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक सूचक ट्विट आज सकाळी केले आहे त्यामध्ये त्यांनी म्हंटलं आहे की कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याची मोहीम हाथी घेतली आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडी ऐका वेगळ्या दिशेनं जात असल्याचे दिसत आहे.