पुणे : सध्या सोशलमिडियाच्या दुनियेत कुठे काय घडेल सांगता येत नाही…सोशलमिडियावर अनेकांना व्हिडीओ कॉल्स येतात ब्लॅक मेलिंग सुद्धा होत. तर राजकीय व्यक्तींना कॉल करून जाब विचारणे किंवा सोशलमिडीवर मेम्स बनवून ट्रोल कारण ह्या सगळ्या गोष्टी चालतात.
आता मात्र भाजपाच्या महिला नेत्याला अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
त्या महिला नेत्या आहेत पंकजा गोपीनाथ मुंडे. मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अमोल काळे असं आरोपीचं नाव असून तो सध्या पुण्यात राहत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता. या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने पोलिस सायबर विभागात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८ आणि ७९ तसंच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अखेर अटक केली.
आरोपी अमोल काळे पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करुन त्रास देत होता. याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस विभागात संपर्क करुन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८ आणि ७९ तसेच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि सदरील तरुणाचा शोध सुरू केला. त्यानंतर सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला भोसरी येथून अटक केली असल्याची माहिती आहे.
त्रास देणारा तरुण हा बीड जिल्ह्यातील रहिवाशी
अमोल काळे वय २५ हा बीडच्या परळी येथील रहिवाशी आहे पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करुन त्रास देत होता. याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकांत संपर्क करुन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि फोन करणाऱ्याचे ठिकाण शोधले आणि तो पुण्यातील भोसरीत असल्याचे आढळून आले. यानंतर, सायबर पोलिसांनी भोसरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपी अमोल काळे याला अटक केली. चौकशीत काळेने पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबुली दिली. अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. एका सायबर अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हा विद्यार्थी आहे आणि त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील हेतू काय आहे हे सध्या तपासले जात आहे.
विशेष म्हणजे अमोल काळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे.
दरम्यान हा तरुण पंकजा मुंडे यांना वारंवार का त्रास देत होता हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.