बीड : जिल्ह्यात भ्रष्टाचाऱ्यांचा ऊत आलेला आहे त्यात भ्रष्टाचारी सत्ताधारी नेत्याच्या जवळचा असेल तर विचारू नका की तो किती भ्रष्टाचार करेल. याचाच जिवंत उदाहरण समोर आले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले विक्रम मुंडे यांनी भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला आहे. त्यांच्या भ्रष्टाचार पहिला तर ते बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचा बादशहा ठरतील असा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, सहकार, औद्योगिक अशा विविध विभागातून करोडींचा भ्रष्टाचार आपल्या जवळच्या नेत्याच्या मदतीने केला आहे. शासनाने या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाईचे आदेश देऊन सुद्धा नेत्याच्या वरदहस्त असल्याने कोणतीही कारवाई आजपर्यंत झाली नाही.
दोन दिवसापूर्वी धनंजय नागरगोजे या शिक्षकाने याच मुंडेंच्या बँकेजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
विक्रम मुंडे यांनी आपल्या सर्व संस्थांवर कुटुंबातील रक्ताचे नातेवाईक मुख्य पदावर बसवून बिनधस्तपणे शासनाचा निधी आपल्या ऐशोआरामासाठी आणि कुटुंबाच्या हितासाठी घशात घातला आहे. आता याच भ्रष्टाचाराची यासाठी मार्फत चौकशी करावी अशा प्रकारची मागणी दत्तात्रेय येडू ठोंबरे माजी पंचायत समिती सदस्य यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे. विक्रम मुंडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मिळून नेत्यांच्या मदतीने कसा भ्रष्टाचार केला ते पाहा.
रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान म. देवगाव ता. केज जि. बीड या संस्थेच्या संचलीत सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आरोग्य केंद्रे, ए. एन. एम/जि.एन. एम ट्रेनिग कॉलेजेस, खाजगी अर्बन बँका, पतसंस्था, तेल उत्पादक सहकारी संस्था, खाजगी जिनींग प्रेसींग, गुळ पावडर उद्योग, सहकारी साखर कारखाना, इंजीनियरिंग कॉलेजेस, स्टँडर्ड इंग्लिश स्कुल, जवळपास 18 युनिट कागदोपत्री, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वरुपात चालु असुन याद्वारे या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान म. देवगाव चे पदाधिकारी अध्यक्ष, श्री. विक्रम बाबुराव मुंडे, उपाध्यक्ष, श्री. विजयकांत विक्रम मुंडे, सचिव, श्री. अतुल विक्रम मुंडे सर्व रा. देवगाव ता. केज यांच्या माध्यमातून शासनाची कोट्यावधी रूपयांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे खालील बाबी सह बोगस प्रकरणा मधुन दिसुन येत असल्याने आर्थिक भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी असलेल्या रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान मर्यादीत देवगाव ता. केज यांचे सह संस्थेचे पदाधिकारी यांची एस. आय. टी. सारख्या महत्वाच्या निःपक्षपाती संस्थे मार्फत सखोल चौकशी करुन शासना सह जनतेची होत असलेली सामाजिक व आर्थिक लुट तात्काळ थांबवण्यात येऊन रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्वान मर्यादीत देवगाव ची मान्यता रद्द करण्यात यावी.
संबंधित रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान म. देवगाव ता. केज यांचे विरुद्ध शासन दरबारी बऱ्याच बोगसगिरी करण्या संबंधीच्या तक्रारी दाखल आहेत व प्रशासना कडुण एका प्रकरणात सखोल चौकशी अंती निधी (रिकव्हरी) वापस करण्या संबंधीचे लेखी आदेशा सह प्रॉपर्टीवर बोजा चढवण्याच्या कारवाया (रिकवरी) रकमेचा भरणा मुदतीत न केल्यास महसुली कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी, बीड. मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. बीड यांचे कडुण दिले गेलेले आहेत.
खासदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव संचलित मौजे सारोळा (धावजेचीवाडी) अंतर्गत अंबाळाचा बरड ता. केज जि. बीड येथे संस्थेच्या मालकीच्या स.नं. गट नं. २९ ई जागेत समाजपयोगी सामाजिक सभागृह बांधकाम करणे, साठी २४.९५ लक्ष ईतका शासनाचा निधी सामाजिक सभागृहाचे काम न करता संगनमताने बोगस उचल करुन रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव या संस्थेने हाडप केला आहे. शासनाची आर्थिक व सामाजिक फसवणूक केली आहे.
शासनाने ज्या मागास असलेल्या भागातील बहुतांश लोक ऊस तोडणीसाठी स्थलांतरीत होतात त्यांच्या पाल्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, विकास व्हावा त्यांचे लग्न, सभारंभ, त्याची महत्वाची कार्य मोफत पार पडुन तेथील वंचीत, पिढीत घटकांचे जिवनमान उंचावेल या उद्देशाने दिलेला निधीचा दुरुपयोग करत शासनाच्या सामाजिक उद्देशाचा संबंधीत संस्थेकडून चकनाचुर करण्यात आला या कामी संस्थेच्या बोगसगिरी ची बाब तक्रारीच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने सखोल चौकशी अंती रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव यांचेकडील बोगस काम दाखवुन उचल केलेल्या १८ लक्ष रकमेसह व्याज अकारुण ३१ लक्ष रुपये (रिकवरी) बोगस उचललेता निधी परत करण्याचा आदेश मा. जिल्हाधिकारी, बीड यांचेकडुण पारीत करण्यात आला.
संबधीत रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव ता. केज ही संस्था शासनाची आर्थिक लुटी सह सामाजिक ऐक्यास झळ पोहोचवण्याच्या पार्श्वभूमीची आसल्याने अर्थीक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सहकार, बँकींग, कृषी, इत्यादी क्षेत्रात बोगसगिरी करत शेकडो कोटी रुपयांची माया शासनाची फसवणूक करुन कर बुडवुन रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान म. देवगाव ता. केज च्या पदाधिकारी यांनी जमा केली आहे २० वर्षा पुर्वीच्या उत्पन्नात आज रोजी हजार पटीने वाढ झाल्याचे संबंधीतांच्या स्थावर व जंगम मालमत्ते वरुण दिसत आहे त्यामुळे खालील सर्व प्रकरणांचा निपक्षपाती तपास एस. आय. टी. सारख्या महत्वाच्या संस्थे मार्फत करण्यात यावा.
जिल्हा बँकेत खोट्या सह्या आणि ठराव घेऊन कर्ज बुडवण्याचा अनोखा फंडा वापरला
रेणुकामाता तेल उत्पादक सहकारी संस्था मर्यादित देवगाव ता. केज च्या माध्यमातून संस्थेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष, श्री. विक्रम बाबुराव मुंडे रा. देवगाव यांनी दि-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मुख्य शाखा बीड या शेतकरी खातेदार असलेल्या शेतकऱ्यांच्या बँकेस व रेणुकामाता तेल उत्पादक संस्थेत शेतकरी यांचे परस्पर त्यांचे सभासद नोंदणी करुण खोटे ठराव घेऊन खोट्या सह्या करून बनावट रेकॉर्ड तयार करून त्यांचे परस्पर बँकेकडे त्यांचे जमीनी संबंधीची महत्वाची कागदपत्रे सादर करुण कर्ज बुडवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सहकारी बँकेचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेत जाणिवपूर्वक कर्जाची परतफेड न करता उद्योग तोट्यात दाखवत संबधीत सहकारी संस्था कर्जबाजारी, दिवाळखोरीत, काढली डि. सी. सी. बँकेकडुण कालांतराने कर्ज वसुलीसाठी गहाणखत प्रॉपर्टीचा लिलाव करून संगनमताने रेणुकामाता तेल उत्पादक सहकारी संस्था मर्यादित देवगाव यांचे अध्यक्ष असणारे श्री. विक्रम बाबुराव मुंडे यांचे रक्ताचे नाते असलेल्या श्री. अतुल विक्रम मुंडे रा. देवगाव ता. केज स्वताच्या मुलांचे नावे तो बँकेकडील लिलाव कवडीमोल भावाने करोडो रुपये किंमतीची मालमत्ता ७ ते १० लक्ष अल्प किमतीत खरेदी करत स्वताच्या कुटुंबाच्या आर्थिक फायदा साधत स्व उत्पन्नात भर घातली गेली
बँकेने उर्वरित कर्जाची रक्कम वसूली करण्यासाठी मा. सहा. सहकार आयुक्त लातुर या ठिकाणी प्रकरण चालवले त्या प्रकरणात संबधीत परस्पर घेतलेल्या संचालकास आपले मत मांडण्या साठीच्या नोटीस संस्थेच्या अध्यक्ष यांनी यंत्रणा मॅनेज करुण संबधीत संचालकां पर्यंत पोहचु दिल्या नसल्याने त्यांची न्याय व्यवस्थे पुढे आपले म्हणणे मांडण्याची संधी हुकली गेली त्यामुळे सहा. आयुक्त यांनी एकतर्फी बँकेचे उर्वरित कर्जाची परतफेड रक्कम संबंधित रेणुकामाता तेल उत्पादक सहकारी संस्था मर्यादित देवगाव यांचे सर्व संचालक यांचेकडुण 17% व्याजासह प्रत्येकी 1,2500000 लक्ष इतकी रक्कम वसुली करण्याचे आदेश दिले.
त्या आदेशाची अंमलबजावणी करत संबधीत बँकेकडुण सर्व संचालक यांचे खाजगी प्रॉपर्टीवर प्रत्येकी 1,2500000 लक्ष किमतीचा बोजा टाकण्यास तहसीलदार केज यांना पत्रव्यवहार केला गेला यामधुन शासनाची, सहकाराची, शेतकरी सभासदांची, संचालकांची आर्थीक, सामाजिक, बदनामी सह फसवणूक करत संघटीत गुन्हेगारी वरील पदाधिकारी यांनी केली आहे ही बाब परस्पर फसवणूक झालेले संचालक शेतकरी श्री. येडु कुंडलिक ठोंबरे यांनी मा. जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बीड (डि.डी. आर. साहेब यांचे तक्रारी द्वारे निदर्शनास आणून दिली असता सखोल चौकशी अंती संबंधीत फसवणूक झालेले संचालक हे मुळ या संस्थेचे सभासद नसल्याचे तपासणी मधुन सिद्ध झाल्याने संचालक होण्याचा प्रश्न येत नसल्याचा अभीप्राय देत त्यांचे प्रापर्टी वरील 1,2500000 लक्ष रुपयांचा बोजा कमी करण्या संबंधी दि. मध्यवर्ती सहकारी बँक बीड यांना स्वता त्या बँकेचे पदसिध्द संचालक असलेले (डि. डी. आर) जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बीड यांनी लेखी आदेशा द्वारे संबधीत बँकस कळवले आहे.
तरी वरील जाणिवपूर्वक करण्यात आलेल्या आर्थीक घोटाळ्या सह संघटीत गुन्हेगारी चा निःपक्षपाती तपास एस. आय. टी. सारख्या महत्वाच्या संस्थे मार्फत करण्यात यावा.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा अवमान
रेणुकामाता प्रतिष्ठान ने न्यायालयाचा अवमान केला आहे दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान यांचे पदाधिकारी श्री. विजयकांत विक्रम मुंडे (उपाध्यक्ष) यांनी दर्गाह हजरत ख्वाजा मुजाहिदीन केज तालुका केज ची ईनामी जमीन खोट्या ग्रा.पं.च्या नोंदी अधारे खरेदीखत घेऊन येथील खिदमतमास ईनामी देवस्थानची जमीन हडप करुन त्या वादग्रस्त जमीनीवर
टोलेजंग व्यापारी ईमारती बांधकाम करुन रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव यांचे माध्यमातून शैक्षणिक संस्था उभी करत शासनाची संबंधीत इमारतीच्या भाडे (किराया) पोटी मोठ मोठ्या रक्कमा उचलून करोडो रुपयांचा मोठा अर्थीक घोटाळा केलेला आहे.
मा. उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात या संदर्भात ताबा सोडण्यासंबधी संबधीत मुळ देवस्थानच्या जमीनीवर मालकी असलेल्या पुजारी यांनी याचीका केलेली होती वरीत प्रकरणी ईनामी जमिनींत केलेले अनाधिकृत व्यापारी इमारतीचे बांधकाम स्व खर्चातून पाडण्याचे आदेश देऊन ईनामी देवस्थान ची जागा मुदतीत खुली करण्यासंबंधी आदेश करुण संबंधीतास’ या प्रकरणी 10 लक्ष दंड देखील मा. न्यायालयाकडुण ठोठावण्यात आलेला आहे तरी पण आज तागायत जागा खुली न करता त्याचा आर्थीक फायदा संबंधित रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान आज घडीला घेत आहे त्यामुळे संबंधित प्रकरणांचा निपक्षपाती तपास एस. आय. टी. सारख्या महत्वाच्या संस्थेकडून करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
विक्रम मुंडेंनी बोगस शाळा दाखऊन करोडींचा निधी घशात घातला
जिल्ह्यातील बड्या नेत्याच्या वरदहस्त असल्याने शासनाच्या बोगस संस्था दाखऊन बोगस पटसंख्या दाखवून शासनाच्या खाद्य आणि निधी विक्रम मुंडे याने आपल्या घशात कसा घातला आहे पहा.
रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव संचलित (१) विश्वनाथ दराडे निवासी शाळा वाघे बाभुळगाव ता. केज, (२) रामकृष्ण महाराज निवासी शाळा पिंपळगाव ता. केज (३) गजेराम मुंडे निवासी शाळा केळगाव/बेलगाव ता. केज (४) रामकृष्ण महाराज निवासी शाळा विडा ता. केज सर्व केंद्रीय निवासी शाळा सहायक समाजकल्याण आयुक्त, कार्यालय बीड तसेच जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग बीड यांचे कडुण बोगस कागदोपत्री मागासवर्गीय वस्तीगृहे चालवत नारीनिकेतन योजनेतून तहसील कार्यालय केज यांचे पुरवठा विभागा कडूण बोगस विद्यार्थी उपस्तीथी पटांची विद्यार्थी शाळेत हजर नसतांना वर्ग भरुण विद्यार्थी यांची प्रत्यक्ष शिकवणी होत नसतांना वरील विभागास विद्यार्थी संख्येची खोटी माहिती सादर करून गहु, तांदुळ मागणी करुण (शेकडो टन) माल उचल करुण काळ्या बाजारात वर्षानुवर्षे विक्री केलेला आहे.
मागासवर्गीय वस्तीगृहाच्या माध्यमातून (१) ज्ञानोबा मुंडे मागासवर्गीय वस्तीगृह देवगाव, (२) रेणुकामाता मागासवर्गीय वस्तीगृह शिंदी, (३) राजा हनुमान वस्तीगृह विडा सर्व ता. केज जि. बीड दर्शविलेल्या ठिकाणी एकही वस्तीगृह प्रत्यक्ष चालु नसतांना त्याठीकाणी ५० ते १०० किलोमीटर अंतरावरील बोगस निकषा मधिल कॅटेगीरी मेन्टेन न करता शेकडो विद्यार्थी उपस्थित दाखवत शासनाची आर्थिक फसवणूक करत प्रत्येक विद्यार्थ्यामागे शासनाचे प्रत्येक महिन्याला १५०० रुपये प्रमाणे शेकडो विद्यार्थी १००% बोगस दाखवत १००% अनुदानाच्या माध्यमातून लाखो रुपये शासनाची आर्थिक लुट देय्यक मागणी, वितरीत अनुदान, ऑडीट मध्ये हेराफेरी करत संस्थेने व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे व या मधुन मोठी माया जमवुन रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव चे पदाधिकारी अध्यक्ष, श्री. विक्रम बाबुराव मुंडे, उपाध्यक्ष, श्री. विजयकांत विक्रम मुंडे, सचिव श्री अतुल विक्रम मुंडे सर्व रा. देवगाव ता. केज हे एकाच कुटुंबातील रक्ताचे नातेवाईक संबंधित संस्थेचे यांनी स्वतःच्या उत्पन्नात भर घातली आहे.
या सर्व प्रकाराची माहिती तक्रारीच्या माध्यमातून मा. जिल्हाधीकारी बीड यांचे निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सदरील प्रकरणात उच्चस्तरीय समिती गठीत करुन सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत परंतु राजकीय वरदहस्तांच्या हस्तक्षेपा मुळे दि. ०६/०५/२०२३ रोजी पासुन आज तागायत संबंधित चौकशी जानिवपुर्वक पेंडींग आहे या संबंधी मा. जिल्हाधिकरी बीड यांनी चार वेळा उच्चस्तरीय समिती गठीत करण्या संबधीच्या आदेशात बदल केला आहे परंतु संबधीत समिती चौकशी करण्यासाठी धजत नाही त्यामुळे संबंधीत प्रकरणांचा निःपक्षपाती तपास एस. आय. टी. सारख्या महत्वाच्या संस्थेकडून करण्यात यावा आशीही मागणी करण्यात आली आहे.
कृष्णा अर्बन बँकेत आर्थिक हेराफेरी करून ठेवीदारांची लूट
वरील रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव चे पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष हे कृष्णा अर्बन को-ऑप. बँक मुख्य कार्यालय केज ता. केज जि. बीड या बँकेचे संस्थापक, अध्यक्ष है एकाच कुटुंबातील रक्ताचे नातेवाईक आहेत सहकार नियमांच्या अधिन राहुन बैंक न चालवता स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी मनमानी करत शासनाच्या सर्व सुविधांचा स्वतासाठी सर्रास वापर करत आहेत.
सन. २००८/०९ या कालावधीत केंद्र सरकारने शेतकरी कर्ज माफीचा घेतलेल्या निर्णयाचा फायदा घेत व्यावसाया साठी वाटप करण्यात आलेले (कमर्शियल) कर्ज मोठी हेराफेरी करत व्यवसाईक कर्ज कृषी कर्जामध्ये वर्ग करत कर्जमाफी मिळवली व बैंकने दुहेरी लाभ मिळवला ज्या कर्जदाराने किराणा दुकानासाठी व्यावसायिक कर्ज घेतले त्यावेळी तो खातेदार भूमीहीन आहे मग त्याचे कर्ज कृषी कर्ज माफीमध्ये कसे येऊ शकते आशा प्रकारे कित्येक पुरावे आहेत.
शेतीविषयक कृषी साठी कर्ज न घेतलेले, कमर्शियल मर्जीतील खातेदार कृषी कर्जाच्या यादीत वर्ग करत जवळपास अंदाजे १००,००००० लक्ष हुन अधिक खातेदारांची माफीसाठी यादी मंजुर केली व संबंधीत माफ झालेल्या यादीतील कमर्शियल कर्जदारा कडुण कर्ज वसुली देखील करत फार मोठा घोटाळा शासनाची आर्थिक फसवणूक करत बँकेच्या पदाधिकारी, व्यवस्थापक यांनी संगनमत करून केलेला आहे.
संबंधित बँकेचे अध्यक्ष विजयकांत विक्रम मुंडे रा. देवगाव ता. केज व संस्थापक अध्यक्ष विक्रम बाबुराव मुंडे रा. देवगाव ता. केज हे रक्ताचे नातेवाईक असुन रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव, रेणुकामाता तेल उत्पादक सहकारी संस्था मर्यादित देवगाव या संस्थेचे देखील पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थापक आहेत
कृष्णा अर्बन बँक चे कर्ज वाटप करतांना सहकार खात्याचे नियमाला बगल देऊन स्वतःच्या रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान सह स्वता अध्यक्ष, संस्थापक असलेल्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी यांना नियमबाह्य मोठमोठ्या रक्मांची कोट्यावधी रुपयांची कर्जे वाटप करून आपल्या कुटुंबाला त्याचा अर्थीक लाभ कसा होईल हे हित संबंधीता कडुण जाणिवपूर्वक जोपासले गेलेले आहे.
नियमबाह्य कर्ज वाटपावर व्याजाची आकारणी, नियमबाह्य दंड आकारुण अनाधिकृत वसुली मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत.
स्वताच्या मालकीच्या ईमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या ईमारती मध्येच बँकेच्या मुख्य शाखेस जागा किरायाने देत लॉकरच्या सुविधा अनाधिकृत पणे स्वताच्या काळा पैसा ठेवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष वापर करत आहेत.
सदरील बँकेला स्वताच्या मालकीची ईमारत वापरुन मनमानी भाडे आकारणी, बँकेच्या टुव्हीलर, फोर व्हीलर गाड्या स्वतासाठी २४ तास सर्रास वापर करत खर्च बँकेच्या माध्यमातून केला जात आहे सभासद खातेदार यांना बँक ओपनिंग पासुन एकदाही नफ्याचे प्रत्यक्ष वाटप केलेले नाही. सर्व रेकॉर्ड, बँकेचे संचालक मंडळांचे धोरणात्मक ठराव, अर्थीक जमा खर्चाचे ताळेबंद खातेदार, सभासद, ठेवीदार, करंट ग्राहकांवर कागदोपत्री खर्च केला जात आहे. खोटे ईतीववृत, दस्त तयार केले जात आहेत याची सखोल तपासणी महत्वाच्या एस. आय. टी मार्फत करुन शासनाची फसवणूक थांबवावी.
त्याचबरोबर रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान च्या नावे कर्ज घेऊन स्वताच्या नावावर कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर मोठमोठ्या व्यापारी ईमारती बांधकाम करण्यासाठी तसेच स्वताचे खाजगी उद्योग चालवण्यासाठी केला जात आहे व त्या मधुन मोठी माया जमा केली जात आहे.
स्वताच्या खाजगी मालकीचे उद्योग (१) राजिवगांधी जिनींग प्रेसींग कापुस केंद्र अंबाळाचा बरड ता. केज हा उद्योग देखील दि. बीड जिल्हा मध्यवर्ती बँक यांचे कडुण सहकारी उद्योगासाठी कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले गेले व कर्जाची परतफेड न करता उद्योग तोट्यात दाखवत बँकेने संबंधीत वसुलीसाठी संबधीत राजीव गांधी सहकारी जिनींग प्रेसींग म. अंबाळाचा बरड यांचे प्रॉपर्टीचा लिलाव केला.
तत्कालीन अधिकारी यांचेशी संगनमत करुन वरील प्रॉपर्टी संबंधित संस्थापक अध्यक्ष विक्रम बाबुराव मुंडे रा. देवगाव यांचे रक्ताचे नातेवाईक एक नंबरचा मुलगा विजयकांत विक्रम मुंडे यांचे नावे कवडी मोल भावाने तुटपुंज्या रकमेत करोडो रुपयांची मालमत्ता खरेदी करत शासनास व बँकेस फसवले व वरील सहकारी उद्योग स्वताच्या खाजगी मालकीत आणला (२) रेणुका गुळ पावडर उद्योग सारुळ अंबाळाचा बरड ता. केज हे मुख्य व्यावसाय चालवण्यासाठी मोठ मोठ्या रक्कमांच्या हेराफेरी वरील बैंक व पतसंस्थेच्या माध्यमातून स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी होत आहेत.
साखरकारखाना काढतो म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या
विजयकांत विक्रम मुंडे, विक्रम बाबुराव मुंडे रा. देवगाव ता. केज या वरील संस्थेच्या पदाधिकारी यांनी ईनरकॉन कंपणी पुणे च्या माध्यमातून सहकारी साखर कारखाना सारुळा (अंबाळाचा बरड) ता. केज या ठीकाणी प्रस्तावीत करुन त्यासाठी मौजे सारुळ ता. केज सह मौजे धावजेचीवाडी ता. बीड मौजे जोला या ठिकाणच्या शेतकरी यांच्या जमीनी साखर कारखाना काढण्याच्या उद्देशाने शेकडो एकर तुमच्या पाल्यांना नोकऱ्या देण्याच्या बदल्यात फुस लाऊन खरेदी केल्या शेअर्स देखील खुप मोठ्या प्रमाणात विक्री करुण फार मोठा अनाधिकृत पैसा जमा केला व त्या मधुन स्वताच्या कुटुंबाचा आर्थिक विकास साधला.
गेली २० ते २५ वर्षांपासून सहकारी साखर कारखाण्याच्या प्रतीक्षेत पिढीत शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे ना कारखाणा ना पाल्यांना नौकरी ना शेअर्स खरेदी केलेले पैसे ना जमीन सर्व काही गमावून संबंधीत पिढीत शेतकरी हत्ताश होऊन बसलेला आहे.
यातुनच नैराश्य येऊन कांहिही अनुचित प्रकार घडू शकतो त्या शेतकऱ्यांना मायबाप सरकारने न्याय देण्याची गरज भासत आहे. शेतकरी यांना देशोधडीला लावण्याचे काम संस्थेच्या वरील पदाधिकारी यांनी केलेले आहे त्यामुळे या सर्व प्रकरणांचा निःपक्षपाती तपास एस. आय. टी. सारख्या महत्वाच्या संस्थे कडुण करण्यात यावा अशी मागणी देखील ठोंबरे यांनी केली आहे.
वरील सर्व प्रकारा मधुन रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान मर्यादीत देवगाव यांचे माध्यमातून पदाधिकारी यांनी बोगस व्यावसायांच्या मिळकतीच्या माध्यमातून पुणे, मुंबई, औरंगाबाद, बीड, केज, या शहराच्या ठिकाणी मोठमोठे भुखंड, फ्लॅट्स, व्यापारी ईमारती खरेदी सह ईमारतीची महागडी बांधकामे स्व कुटुंबातील सदस्यांचे नावे केलेली आहेत.
केज तालुक्यातील देवगाव, विडा, पिंपळगाव, शिंदी, सांगवी, सारणी, अंबाळाबा बरड, जोला, सासुरा, बाभळगाव, नांदुरघाट, सारुळ, केळगाव/बेलगाव, साळेगाव, माळेगांव, सर्व तालुका केज इत्यादी ठिकाणी मोठ मोठ्या व्यापारी ईमारती व मोठमोठ्या कमर्शियल उद्योगासाठी च्या जागा जमीनी, कर्मचारी यांचे नावे पेट्रोल पंप, विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमातून अनाधिकृत नौकरी भरती या सर्व बाबीमधुन शेकडो कोटी रुपयांची अनाधिकृत स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केली
शासनाचा कर चुकवून उत्पन्नात भरमसाठ वाढ केली आहे सन. १९९० पासुन सन. २०२४ पर्यंतचे उत्पन्नाची रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान मर्यादीत देवगाव यांचे पदाधिकारी यांचे कुटुंबीय यांच्या मिळकतीचे उत्पन्नाची एस. आय. टी मार्फत सखोल चौकशी करुन कठोर कारवाई करुन रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान यांची मान्यता रद्द करण्यात यावी व संबंधित संस्थेचे दोषी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव इत्यादी पदाधिकारी यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती. अशी मागणी ठोंबरे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना केली आहे.