दिल्ली : समाजवादी पार्टी चे प्रमुख अखिलेश यादव 51 वर्षांचे झाले आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त सपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सकाळपासूनच लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत, त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव आहे. लोकसभा निवडणुकीत विशेष बाब म्हणजे यावेळी अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल हे दोघेही खासदार झाले आहेत
आणि यादव हे पती-पत्नी म्हणून संसदेत पोहोचणारे एकमेव खासदार जोडपे आहेत. खरंतर अखिलेश यादव यूपीच्या यादव समुदायाचे प्रतिनिधित्व करतात तर त्यांची पत्नी डिंपल यादव उत्तराखंडच्या ठाकूर आहेत हे विशेष आहे.
पेरक्षकाहो अखिलेश आणि डिंपल या दोघांची प्रेमकहाणी फार मजेशीर आहे.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असणारा अखिलेश नावाचा विद्यार्थी एका डिंपल नावाच्या शाळकरी मुलीच्या प्रेमाप पडतो म्हणजे अखिलेश यादव हे 21 वर्षांचा नेता एका 17 वर्षांच्या मुलीच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडला होता,
जेव्हा यूपीचे माजी प्रमुख स्व. मुलायम सिंह यादव यांचा मुलगा अखिलेश म्हैसूरच्या श्री जयचामराजेंद्र कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून सिव्हिल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता.
तेव्हाच त्याची आणि डिंपल ची एका पार्टीत भेट झाली, दोघांची ओळख त्यांच्या एका मित्राने करून दिली होती आणि ती भेट डिंपल आणि अखिलेश दोघांसाठी फार महत्वपर्ण ठरली.
त्यावेळी अखिलेश 21 वर्षांचे होते तर डिंपल 17 वर्षांची होती. अखिलेश पहिल्या नजरेतच सुंदर डिंपलच्या प्रेमात पडले आणि डिंपल देखील त्यांना आवडली, त्यांची मैत्री झाली आणि ती मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही कळलं नाही. मात्र कालांतराने त्या दोघांनाही कळले की ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.
दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले खरे मात्र काही काळात त्यांना दुरावा सहन करावा लागला. B.Tech नंतर अखिलेशला पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जावे लागले. त्यावेळी मोबाईल फोन आणि व्हॉट्सॲप, असे काही नसल्यामुळे अखिलेश तिथून डिंपलला गुलाबी फुलं पाठवत असे.
पुढे दिपल आणि अखिलेश यांचे प्रेमप्रकरण चार वर्षे चालले पण कोणालाच कळले नाही. आता त्या दोघांना लग्न करायचं होत मात्र दोघांचे लग्न सोपे नव्हते, वडील मुलायमसिंह यादव हे लग्नाला परवानगी देणार नाहीत हे अखिलेश यांना माहित होते.
दोन वर्षांनी अखिलेश भारतात परतले तेव्हाच त्यांनी वडील मुलायम सिंह यांना आपल्या आणि डिंपलच्या नात्याबद्दल सांगितले.
मात्र मुलायमसिंह या नात्यासाठी तयार नव्हते, त्यावेळी त्यांना आपल्या मुलाची म्हणजे अखिलेश यादव यांना राजकीय परिस्थिती बळकट करण्यात व्यस्त होते, आणि अशा परिस्थितीत पहाडी ठाकूरला आपल्या कुटुंबाची सून बनवणे त्यांच्यासाठी फार कठीण होते,
परंतु मुलगा अखिलेश यांचा हट्ट पुरवायचा होता आणि मुलगा मुलगा असतो आणि अखेर मुलाच्या आग्रहास्तव त्यांनी खूप विचार करून लग्नाला परवानगी दिली.
त्यानंतर 1999 मध्ये अखिलेश-डिंपलने मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नानंतर त्यांना (दोन मुली आणि एक मुलगा) अशी तीन अपत्य आहेत. विशेष बाब म्हणजे 15 मार्च 2012 रोजी अखिलेश यादव वयाच्या 38 व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले, यूपीचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आणि आजचे बोलायचे झाले तर अखिलेश यादव आणि डिंपल यादव हे दोघेही खासदार आहेत…
तर प्रेक्षक हो हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा….