.
परळी : समाजाच्या पुनर्निर्माणासाठी राजसत्ता अत्यंत महत्त्वाची असते असे प्रतिपादन फुले- आंबेडकरी अभ्यासक प्रशांत मस्के यांनी केले .परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवनात मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त स्टुडंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी व फुले-आंबेडकरी अभ्यास समूह आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मान्यवर कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवर कांशीराम साहेबांकडून आपण काय शिकावे?किंवा
मान्यवर कांशीराम साहेब : फुले-शाहू-आंबेडकरी आंदोलनाचे अंतिम ध्येय गाठण्यासाठीची संघटीत लोकोत्तर आभा या विषयवर पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक परळी औ.वि .निर्मिती केंद्राचे उपकार्यकारी अभियंता शिवाजी होटकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपकार्यकारी अभियंता श्रीकांत इंगळे हे होते.तसेच ज्येष्ट पत्रकार रानबा गायकवाड, प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे,ओमप्रकाश बुरांडे, प्रा.संपत वाघमोडे, मुक्ताराम गवळी, हरिभाऊ आगलावे, प्रशांत कदम, अॅड. बुधभूषण उजगरे, अॅड. कपिल चींडालिया, अॅड.पंकज रायभोले, इम्रान शेख ,आकाश देवरे, महेश मुंडे, एस.के.गित्ते,आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना प्रशांत मस्के म्हणाले की ,तथागत बुद्धांचा मेत्ताभाव जगभर पसरविण्यासाठी सम्राट अशोक यांनी आपल्या राजसत्तेचा उपयोग केला.
भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या मेत्ताभावनेवर आधारित समाजाचे पुनर्निर्माण करणे हेच कांशीराम साहेबांचे चळवळीच्या अंतिम उद्दिष्ट होते.मान्यवर कांशीराम यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन समाजाचे पुनर्निर्माण करण्यासाठी सत्ता संपादन केली. बहुजन समाज पार्टीची स्थापना करून उत्तर प्रदेशचे सरकार चार वेळा स्थापन केले . 2003 च्या दरम्यान देशातील तिसरी राष्ट्रीय पार्टी म्हणून मान्यता मिळवली.आणि बाबासाहेबानंतर चळवळ का असफल झाली आणि बहुजन समाजातील लोक ब्राह्मणवादी पक्षा सोबत का गेले याचा अभ्यास मान्यवर कांशीराम साहेब यांनी केला आणि त्यांना दोन प्रमुख कारणे सापडली पूना करार आणि गैर राजकीय मुळे कमजोर असणे.असे त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उप कार्यकारी अभियंता शिवाजी होटकर, उप कार्यकारी अभियंता श्रीकांत इंगळे, ज्येष्ठ साहित्य रानबा गायकवाड आदींनी आपले विचार मांडले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण वैराळ यांनी, सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे तर आभार नितीन ढाकणे यांनी मानले.