सातारा: शिवसेना नेते, सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई साहेब हे शिंदे सरकारमधील महत्वाचे शिलेदार आहेत, अशा शब्दांत धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, आरोग्यसेवक बाजीराव (दादा) यांनी देसाई यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन करताना गौरव उदगार काढले.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मवीर प्रतिष्ठानतर्फे यथोचित सन्मान करून मंत्री महोदय देसाई यांना शुभेच्छा दिल्या. धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संपूर्ण राज्यभरात आरोग्यसेवक म्हणून नावाजलेले बाजीराव चव्हाण, नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे, कार्यासन अधिकारी अतुल डहाने,मुबईचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले, राज्य उत्पादन शुल्क उपसचिव
रविंद्र औटे, कोल्हापूरचे राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त चिंचाळकर साहेब, पुण्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत, डॉ. मिलिंद शिंदे आदी मान्यवरांनी मंत्री महोदय देसाई यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
…………. ……..
धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून
आदर्श वाढदिवसाची संकल्पना
राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई हे समाजातील सामान्य माणसांची काळजी घेणारा लोकनेता आहे, अशा शब्दांत धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांनी कौतुक केले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सातारा जिल्हयातील पाटण मतदारसंघात बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले असून आदर्श कार्यक्रम आणि धर्मवीर प्रतिष्ठान हे आता समीकरण रूढ होताना दिसत आहे. या उपक्रमाचे कौतुक होताना दिसत आहे.