कोल्हापूर : खा.शरद पवार यांची पहिला सभा भुजबळांच्या नाशकात, दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये तर तिसरी सभा ही कोल्हापुरात होणार आहे.
कोल्हापुरात राष्ट्रवादी मजबुत आहे मात्र उभ्या फुटीनंतर विद्यमान असलेले दोनीही आमदार अजित पवार गटात आहेत शरद पवार यांना नव्याने तिथे उमेदवार द्यावे लागतील आणि त्यांना ताकत द्यावी लागणार आहे,
कोल्हापुरातील चंदगड आणि कागल विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेल्या १५ वर्षेपासून सलग टिकून आहे. राजेश नरसिंगराव पाटील हे चंदगड तर हसन मियालाल मुश्रीफ हे कागल मतदान संघातून निवडून आलेले आहेत विशेषतः हसन मुश्रीफ हे सलग तीनवेळा म्हणजेच २००९ ते २०१९ पर्यंत निवडून आलेले आहेत ते आत्ताही विद्यमाने आमदार तथा अजित पवार गटाचे मंत्री सुद्धा आहेत.
कोल्हापूरच्या ६ विधानसभा मतदार संघात २ राष्ट्रवादी १ शिवसेना आणि ३ काँग्रेस असे लोकप्रतिनिधी आहेत भाजपा एकाही मतदारसंघात विजय मिळवू शकलेली नाही. आता शरद पवार यांची २५ ऑगस्ट ला कोल्हापुरात सभा होणार आहे त्यामुळे आता कोल्हापूर काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या सभेमध्ये नवीन काय असणार आहे तर शरद पवार यांच्या साभेच्या अध्यक्षस्थानी शाहू राजे भोसले असणार आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा नवा फ्रेश चेहरा शाहूराजे भोसले असणार आहेर अशी जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे.
कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे शरद पवार यांची ही राजकीय खेळी आहे हे आता सिद्ध झाले आहे, पावरांच्या डोक्यात काय चालतं हे शेवटपर्यंत कोणालाही कळत नाही आणि ते जेव्हा डाव टाकतात तेव्हा तो फेल जात नाही असे अनेकदा घडलेलं आहे त्यामुळे कोल्हापुरात नेमकं काय घडणार येणारा काळ ठरवेल.
शरद पवार यांची पहिली सभा येवल्यात झाली दुसरी बीडला आणि तिसरी कोल्हापूरात, या तीनही सभांबाबद आपण विचार केला तर तीनही ठिकानी शरद पवार यांनी उभारी दिलेले बडे नेते त्यांना सोडून गेलेले आहेत त्यामुळे ज्यांनी मीठ राखले नाही अशांना धडा शिकवण्यासाठी पवारांनी आता कंबर कसली आहे.
हसन मुश्रीफ हे कागल मतदार संघात प्रभावी आहेत, तीनवेळा ते तेथून विजयी झालेले आहेत, मात्र त्यांनी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारले आणि राजेश पाटील हे तर अजित पवार यांचे चाहते आहेत अजित पवार जोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाहीत तोपर्यंत मी वाढदिवस साजरा करणार नाही असा निर्धार आ राजेश पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात गेलेले आहेत.
आता कोल्हापूर शरद पवार यांना नवखे उमेदवार द्यावे लागतील आणि त्यांना रसद पुरवून विजयी करावे लागणार आहे, मात्र त्यांना विजयी करणं किती सोप्प याचाही विचार करणं गरजेचं वाटतं कारण हसन मुश्रीफ तीन वेळा विजयी होतात त्यांचे मतदारसंघात काहीतरी काम असेलच ना मग ते सुद्धा पाहावं लागणार आहे.
याशिवाय या वयात भाजपा ने पळापळ केली त्या भाजपला पुन्हा एकदा कोल्हापूरात पाय न ठेऊ देण्यासाठी पवार शाहू राजेंना लोकसभेची उमेदवारी देऊन ते स्वप्न पूर्ण करतील का हे पाहणं महत्वाचे आहे.