संग्राम धन्वे ९४०५३५९२६६
बीड : मागील ७ मे २०२३ रोजी पोलिस भरती प्रक्रिया पार पडली ज्यामध्ये मुंबई सह राज्यातील काही जिल्हात पेपर फुटले, ते साध्य पध्दतीने नाही तर ज्याला हायटेक कॉफी म्हंटलं गेलं आहे. कारण मुंबई मध्ये काही परिक्षा केंद्रांवर चक्क अंगातील शर्ट च्या गुंड्यामध्ये कॅमेरा लावून लावून पेपर फोडला, तर काही ठिकाणी मोबाई6मध्ये फोटो काढून व्हाट्सएपच्या माध्यमातून बाहेर फोटो पाठवून कानात डिव्हाईस लाऊन पेपर सोडवला आहे.
एवढेच नाही तर खेळाडू, प्रकल्पग्रस्त असे बोगस प्रमाणपत्र दाखल करून हजारो विद्यार्थी बोगस नोकरीला लावले आहेत मागील पाच वर्षात अनेक बोगस नोकरदार लावले आहेत आणि ते शासनाचा पगार उचलतात.
धक्कादायक बाब म्हणजे मागील पाच वर्षात आरोग्य विभाग, वनविभाग, शिक्षण विभाग, तलाठी, पोलिस या क्षेत्रात बोगस विद्यार्थी नोकरीला लावले आहेत. आणि या सगळ्या बोगस नोकऱ्या लावणारे लोक मराठवाड्यातील आहेत, ज्यामध्ये बीड अग्रेसर आहे बीडमधील तब्बल ७ सात दलाल आहेत त्यातील दोन शासकीय नोकरीला आहेत. त्यापैकीच एक व्यक्ती बीडच्या दारूबंदी विभागात नोकरीला आहे आणि त्याने गेल्या काही वर्षांत त्याचे अनेक नातेवाईक नोकरीला बोगस पध्दतीने लावले आहेत, तो महाराष्ट्रात सगळीकडे खेळाडू प्रमाणपत्र पुरवणारा खरा सूत्रधार आहे. जर या दारूबंदी कार्यालयात नोकरीला असलेल्या ईसमाला अटक करून चौकशी केली तर अनेक नातेवाईक बोगस निगतील हे सत्य नाकारता येत नाही. एवढेच नाही तर तो दारूबंदी कार्यालयात कधी येतो आणि कधी जाती कोणालाही खबर नाही, दारूबंदी कार्यालयाकडे विचारणा केली असता ते काहीही माहीत नसल्याचे सांगतात, खोदून विचारले तरी ते माहिती देत नाहीत त्यामुळे दारूबंदी कार्यालयातील अधिकारी त्या दलाला व्यक्तीला सहकार्य करतात की काय असा संशय व्यक्त होत आहे.
याशिवाय अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे बीड येथील ऐका दलालाकडे तब्बल दीड कोटींचा कॅमेरा आहे आणि तो पेपर फोडण्यासाठी वापला जात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, एक विद्यार्थ्यांकडून १२ लाख घेतले जातात अशी माहिती आहे मग राज्यातील हजारो गुणिले १२ लाख केले तर रक्कम तोंडात बसत नाही.
तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही मग या दलालांना अभय नेमकं कोणाचं आहे? हा खरा सवाल आहे, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर लोकांचे लेकरं रात्रंदिवस मेहनत करतात आणि धनदांडगे लोकं नोकऱ्या मिळवतात ही शोकांतिका आहे.
मागील महिनाभरापासून मुंबई पोलिस मराठवाड्यात फेऱ्या मारतायत मात्र त्यांना मुख्या सूत्रधार सापडला नाही सापडला तर दोन दिवसात जमीन होते दुसरीकडे पाहिले तर पेपरफुटी घोटाळ्यातील बोगस प्रमाणपत्र लिहून देणारे, दोन महिन्यांपासून पोलिस कस्टडीत आहेत, जे विद्यार्थी पैसे देऊन पास झाले त्यांना अटक केली जातेय, त्यांच्यावर गुन्हे दाखक होत आहेत मात्र मुख्य सूत्रधार सापडत नाहीत याचे आश्चर्य वाटतं की पोलिस येतात कशासाठी? आरोपींना पकडायला येतात की सेटलमेंट करायला? हा सवाल उपस्थित होतो आहे त्यामुळे जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना अटक केली जिथे जिथे त्यांनी घोटाळे केले त्या-त्या ठाण्यात त्यांचा PCR व्हावा आणि जिथे दोषी आढळतील तिथे त्यांना अटक झाली तर बोगसगिरी थांबेल अन्यथा बोगस नोकरदारांचे राज्य म्हणून ओळखले जाईल.