बीड : आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची खांदे पालट केली आहे, राज्यातील दिग्गजांना जिल्हाध्यक्ष पद सोडावे लागले आहे मात्र महाराष्ट्र राज्यता एकमेव असा जिल्हा ज्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची बदली झाली नाही, भारतीय जनता पार्टीची भूमिका होती की राज्यातील कोणताही जिल्हा प्रमुख पुन्हा होणार नाही मात्र एकमेव असा बीड जिल्हा आहे ज्याचा बदल झाला नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण राज्यात वेगळा न्याय आणि बीड जिल्ह्याला वेगळा अस पाहायला मिळतेय.
खरंतर बीड जिल्हा पंकजा मुंडे यांचा आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडे जस म्हणतील तसंच होईल हे अनेकवेळा उघड झालेलं आहे कारण बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत ते गेल्या तीन वर्षेपासून जिल्हाध्यक्ष आहेत तरीही पुन्हा तेच बीडचे जिल्हाध्यक्ष असणार आहेत.
याबाबद बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना विचारले असता त्यांनी सांगितले की राज्यातील जिल्हाध्यक्ष बदलाची यादी जाहीर झाली आहे मात्र बीडचे नाव त्यात नाही कारण बीडचे जिल्हाध्यक्ष बदलले नाही पुन्हा मीच जिल्हाध्यक्ष आहे. खरंतर राजेंद्र मस्के जरी म्हणाले की मीच जिल्हाध्यक्ष आहे मात्र नव्या यादीमधून बीडचे नावच वगळले असल्याने, पुन्हा बदल होणार का? हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान पक्षाची कोणतीही भूमिका असुद्या पंकजा मुंडे यांची जी भूमिका असते ती राजेंद्र मस्के यांची असते, राजेंद्र मस्के यांची पंकजा मुंडे यांना खंबीर साथ असते म्हणून बीडचा जिल्हाध्यक्ष बदलला नाही असे म्हणता येईल.
हे आहेत नवे जिल्हाध्यक्ष