युवराज मेश्राम | प्रतिनिधी
नागपूर : कन्हान कामठी येथे राजेंद्र मुळक यांचे जनसंपर्क कार्यालय, कन्हान येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद तर्फे सर्व कलाकार मंडळी सोबत चिंतन सत्र बैठकीचे आयोजन मनिष भिवगडे अलंकार तेंभुरने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
मागील हिवाळी अधिवेशनात माजी सांस्कृतिक मंत्री यांना विदर्भ शाहीर कलाकार परिषदे तर्फे निवेदन सोपवण्यात आले होते व त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल व परिषदेचे सर्व मांगण्या पूर्ण होतील अशी आश्वासने देण्यात आली होती, मात्र अद्याप ही त्यावर काही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे कलाकार मंडळींना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
यासंदर्भात सर्व कलाकार पदाधिकारी व सदस्य यांच्या समवेत समस्यांवर काय मार्ग काढता येईल यावर चर्चा करण्यात केली गेली यावेळी, दयालजी कांबळे, चुडामनजी लांजेवार,अरुण वाहने,मनोहर धनगरे,रामेश्वर दंडारे,गौरीशंकर गजभिये,ज्ञानेश्वर तायवाडे, पुरुषोत्तम डांगोरे,पत्रकार युवराज मेश्राम तसेच महिला प्रतिनिधी सौ.विद्या लंगडे, सौ.मंजुषा बनकर, सौ.मीरा कांगले, सौ.रंजना खाडे, सौ. जिजा डोंगरे,अशोक हूमने,आषिक राहुले,सुधीर लांजेवार,राहुल लांजेवार,दिलीपराव आसकर, दिगंबर मासुरकर आणि समस्त कलावंत उपस्थित होते