पुणे : सदाशिव पेठेत दोन दिवसापूर्वी एका तरुणीवर प्रेम प्रकरणातून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. यघटनेनंतर पुणे हादरले होते,
एकीडकडे त्या मुलीचा जीव वाचल्याबद्दल त्या तरुणांचे कौतुक केले जात आहे तर दुसरीकडे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होत आहे. पुण्यात जो त्या मुलीवर हल्ला झाला त्या घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट पोलीस चौकीमध्ये तीन कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस हवालदाराना निलंबन करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी काढले.
पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सदाशिव पेठेत दोन दिवसापूर्वी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आरोपी शंतनू जाधव याने एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तरुणी जखमी झाली, हल्लेखोरास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.पण घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट चौकीत त्यावेळी पोलिस नव्हते. या घटनेनंतर तब्बल २० मिनिटांनी पोलीस कर्मचारी पोलिस चौकीत आणि घटनास्थळी दाखल झाले असे सांगण्यात येत आहे
ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येताच पुण्यातील नागरिकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती, संताप व्यक्त केला होता, विरोधी पक्षांनीही टीकेची झोड उठवली होती.
या सर्व घडामोडी दरम्यान पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी तिघांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत.