संग्राम धन्वे | मराठी महाराष्ट्र विशेष
९४०५३५९२६६
बीड : नोकर भरती घोटाळ्यात बीड जिल्ह्यातील अनेक दलाल गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत, नोकरभरती घोटाळे करून ते लखपती झालेले आहेत आणि त्यामुळे ते तडकाफडकी सेटलमेंट करत आहेत आणि करवाईपासून वाचत आहेत अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर सुध्दा आहे.
बीड तालुक्यातील ‘अशोक शेळके’ नामक व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून नोकरभरती घोटाळ्यात सामील आहे, सदरील व्यक्तीने जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो लोकं पैसे घेऊन बोगस नोकरीला लावले आहेत ते आजही शासनाचा भरगोस पगार उचलतात.
मागील मे महिन्यात झालेल्या पोलिस भरती घोटाळ्यात त्याचा महत्वाचा सहभाग आहे, मुबंई पोलिस भरती घोटाळ्यात शेळके नामक व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे बीड जिल्ह्यातील जवळजवळ अंदाजे ५० बोगस पोलिस नोकरीत भरती केल्याची माहिती आहे आणि त्या घोटाळ्यात या महाशयाची महत्वाची भूमिका राहिली आहे अशी चर्चा आहे.
‘अशोक शेळके’ हा बीडच्या उत्पादन शुल्क विभागात नोकरीला आहे आणि तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार असल्याची माहिती मिळाली आणि त्याविषयी सत्यता जाणून घेण्यासाठी ‘मराठी महाराष्ट्र’ ने उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात चौकशी केली असता गेल्या महिनाभरापासून तो गैरहजर आहे म्हणजेच कार्यालयाच्या माहिती नुसार तो दि.२६ मे २०२३ रोजीपासून बेपत्ता आहे तसेच त्याने समंदित कार्यालयाला कोणतीही पूर्व कल्पना न देता तो गैरहजर आहे असे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. आम्ही त्याच्या शोधात आहोत जेव्हा कधी तो कार्यालयात येईल तेव्हा तो कोठे होता याबाबद माहिती मिळेल तेव्हा आम्ही आपल्याला कळवू तसेच त्याच्यावत कायदेशीर कारवाई करू असे उत्पादन शुल्क कार्यालयातुन सांगितले गेले आहे.
तर दुसरी आणि महत्वाची माहिती उत्पादन शुल्क विभागतून मिळाली ती अशी आहे की मुंबई पोलिसांनी बीडच्या उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला दि.२ जून २०२३ रोजी सदरील ‘अशोक शेळके’ नामक व्यक्तीला चौकशीसाठी मुंबई पोलिसात पाठवा असे पत्र दिले आहे. मात्र ते पत्र अद्यापही बीडच्या उत्पादन शुल्कच्या कार्यालयात पडून आहे कारण ‘अशोक शेळके’ याचा संपर्क झाला नसल्याने ते पत्र देऊ शकलो नाहीत असे कार्यालयाने सांगितले आहे.
त्याचबरोबर अशोक शेळके विषयी ‘मराठी महाराष्ट्र’ ला माहिती देत असतांना बीडच्या उत्पादन शुल्क कार्यालयाकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे ऐका उत्तरासाठी चार सवाल करावे लागले तेव्हा वरील थोडाफार माहिती मिळाली त्यामुळे बीड उत्पादन शुल्क विभातील अधिकारी आणि शेळके यांच्यात काहीतरी शिजतंय असा संशयास्पद वास येत आहे त्यामुळे बीडच्या उत्पादन शुल्क कार्यालयाला शेळके यांना वाचवायचे आहे की बीडच्या कार्यालयाला वाचवायचे आहे हा मोठा सवाल उपस्थित झाला आहे.