पुणे : काल २७ जून रोजी पुणे शहरातील ऐका मुलीच्या मागे धावत कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न ऐका तरुणाने केला, मात्र दोन धाडसी तरुण पुढे आले आणि त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या तरुणाला पडकून पोलिसांच्या स्वाधिन केले मुलीचा चिव वाचवला.
याच हे दोघे तरुण पुण्यात MPSC ची तयारी करत आहेत आणि या त्यांच्या धाडसी कामगिरीमुळे प्रभावीत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी त्या दोघांना प्रत्येकी ५० हजार रु. देण्याचे जाहीर केले आहे.
आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांची जशास तशी पोस्ट खाली आहे.
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल…!!
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील… pic.twitter.com/1Cxt1DuGBs
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 27, 2023
आ.जितेंद्र आव्हाड यांच्या आशा प्रेरणादायी घोषणेमुळे नवयुवक आता गुन्हेगारी रोखण्यासाठी पुढे येतील आणि गुन्हेगारी थांबण्यास आणि पोलिसांनाही मदत होणार आहे, जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे सर्वस्तरातून त्यांचं कौतुक केलं जातं आहे.