पुणे : संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील केएसबी चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते,जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे,जिल्हा उपाध्यक्ष वैभव जाधव,शहर अध्यक्ष सतीश काळे,सचिव मंगेश चव्हाण,शहर कार्याध्यक्ष संजय जाधव,उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मराठा सेवा संघाचे अशोक सातपुते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सतीश काळे म्हणाले की राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणुन साजरा केला जातो. समता,बंधुत्व तत्त्वांची शिकवण देणारे व आरक्षण धोरण प्रभावीपणे राबविणारे महान राजे म्हणुन शाहू महाराजांचे कार्य प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते आहेत. समतेचा लढा त्यांनी उभा केला. शाहू महाराज यांचा विचार समाजात रुजविण्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा सज्ज हाेण्याची गरज आहे. शाहू महाराजांचे विचार आजच्या काळात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. शाहू महाराज हे राजकारणाबरोबर समाजकारणाचे एक रोल माॅडेल हाेते. त्यांच्या शिवाय काेणतेही राजकारण किंवा समाजकारण हाेऊ पुर्ण शकत नाही असे प्रतिपादन सतीश काळे यांनी केले.