मुंबई : पोलिस भरती घोटाळ्यात बीडचा मोठा हात आहे, कारण अर्धे आधीक दलाल हे बीड जिल्ह्यातील आहेत, आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बोगस नोकरदार हे बीड जिल्ह्यातील दलालांनी लावले आहेत. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महसूल मधील तलाठी, ग्रामसेवक, पोलिस, वनविभाग,म्हाडा, अग्निशमन विभाग यासह ज्या-ज्या क्षेत्रात सेटिंग लावता येईल तिथं यांनी बोगस नोकरभरती बीडच्या दलालांनी केली आहे, असे असतानाही पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत.
मग याचा अर्थ असा आहे का की सर्वाधिक जास्त बोगस नोकरदार हे पोलिस क्षेत्रात आहेत, किंवा मग दलाल हेच पोलिस दलात नोकरीला आहेत का? अशी चर्चा महाराष्ट्रात आहे. आणि जर असे असेल तर महाराष्ट्र पोलिसांच्या वर्दीवर बदनामीचा लागलेला डाग कोण पुसणार? हा खरा सवाल आहे.
काल झालेल्या पोलिस भरती मध्ये मुबंई पोलिस भरती घोटाळ्यात बीडचा मोठा सहभाग आहे म्हणजे सिंहाचा वाटा आहे, बीड जिल्ह्यातील जवळजवळ ५० हुन अधिक बोगस नोकरदार करण्याचा दलालांचा डाव अर्ध्यावर यशस्वी झाला आहे मात्र जे बोगस विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी अद्याप पडताळणीसाठी गेलेले नाहीत कारण त्यांना कारवाईची मोठी भीती आहे, पकडण्याची मोठी भीती आहे ते प्रमाणपत्र, कागदपत्रे तपासणीसाठीसुद्धा गेलेली नाहीत.
तर दुसरीकडे त्यांच्या दलालांमार्फत त्यांना पुन्हा सेटिंग लावून नोकरीला लावतो असे आश्वासन देऊन थांबवले आहे मात्र पोलिसांनी कारवाई तीव्र चालू केली आहे असे दिसून येत आहे. पोलिसांनी मुख्य दलालांना पकडणे आवश्यक आहे तरच या रॅकेटचा पूर्ण तपास लागेल.
मागील काही दिवसांपूर्वी बीड पोलिस दलातील शेळके नामक ऐका कर्मचाऱ्याला पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले होते मात्र त्याची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, ती सुटका कशी झाली याची माहिती आम्ही घेत आहोत. त्यानंतर बीड येथीलच काळे नामक व्यक्तीच्या भावाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे त्याचीही कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
बीड येथील परीक्षा घोटाळ्यात सहभागी असलेले दलाल म्हस्के, शेळके,गंगावणे,काळे हे सर्वजण सध्या फरार आहेत मात्र काल झालेल्या भरतीतील बोगस विद्यार्थ्यांच्या ते संपर्कात आहेत, तुमचे काम होणार आहे तुम्ही निश्चिन्त राहा आम्ही सेटिंग लावतो असे सांगत आहेत मात्र, ते बोगस विद्यार्थी आता लागणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकीकडे पोलिस मुख्य दलालांना पकडत नाहीत इतरांना ताब्यात घेतात चौकशी करतात मात्र सोडून का देतात हे अद्याप समजलेलं नाही, तर दुसरीकडे कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना मॅनेज केले जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. म्हणूनच मुख्य दलाल पकडले जात नसावेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
बीड तालुक्यातील, जुजगव्हांन, बक्करवाडी, कऱ्हाळवाडी, वांगी, नाळवंडी, ढेकनमोह, या गावातील बोगस लागलेली मुले ट्रेस झालेले आहेत, त्यांनी स्वतःची पडताळणी थांबवली आहे ते प्रमाणपत्र तपासणीला सामोरे जात नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आम्ही देखील यासंदर्भात बीडच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माहिती मागावत आहोत, दरम्यान बीडच्या दलालांची हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या तोंडातील घास हिसकावून घेतला आहे त्यामुळे जोपर्यंत बीड जिल्ह्यातील दलाल आणि जे-जे विद्यार्थी बोगस लागले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मराठी महाराष्ट्र हा संग्राम सुरूच ठेवणार आहे.