मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे कथित व्हिडीओ प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील मूळ व्हिडीओ पोलिसांना अजून सापडलेला नाहीये. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शीतल म्हात्रे यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमातील मूळ व्हिडीओ मिळत नसल्याने अखेर पोलिसांनी काही गोष्टींचा उल्लेख करून आरोपपत्र कोर्टात सादर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे प्रकरण कमकुवत होणार की नाही? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शीतल म्हात्रे यांच्याशी संबंधित मूळ व्हिडीओ शोधण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. त्यामुळे दहिसर पोलीस चुकीचं गाणं वापरून व्हिडीओ व्हायरल केल्याचे आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. दहिसर पोलीस हे आरोपपत्र दाखल करणार आहे. दहिसर पोलिसांनी या प्रकरणातील मूळ व्हिडिओ शोधणाचा अतोनात प्रयत्न केला. पण त्यांना मूळ व्हिडीओ सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. हा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केल्याचं शीतल म्हात्रे यांचं म्हणणं होतं. या व्हिडीओत गाणं टाकून तो व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी घुगे यांना अटक केली होती. मात्र, आता मूळ व्हिडिओ सापडत नसल्याने व्हिडीओ मॉर्फ केल्याचा आरोप कसा सिद्ध होणार? असा सवाल केला जात आहे.
आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या सात शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्यांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या जवळचे साईनाथ दुर्गे यांचा देखील समावेश होता. या सात जणांना कोर्टात दाखल करण्यात आले होते. बोरिवली न्यायालयाने साईनाथ दुर्गे यांच्यासह इतर सहा आरोपींना जामीन मंजूर केला होता. अटी शर्ती घालून त्यांना जामीन देण्यात आला होता. ज्येष्ठ वकील राजेश मोरे, ज्येष्ठ वकील अनिल पार्टे यांना वकील प्राची पार्टे, वकील मेराज शेख यांनी या प्रकरणी युक्तिवाद केला होता.
आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी शीतल म्हात्रे यांना सवाल केला आहे, तुम्ही जो आरोप आमच्या कार्यकर्त्यांवर केला होता तो सिद्ध झालेला नाही तो व्हिडिओ पोलिसांना सापडलेला नाही अर्थात तसा कोणता व्हिडिओच नाही असेल तर शीतल मात्र आपण तो व्हिडिओ सादर करा, अन्यथा जो व्हीडियो सोशल मीडियावर फिरत होता तो माझ्याकडे आहे, आणि तोच खरा व्हिडिओ आहे असे समजायचे का? ज्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पप्पी घेतांना दिसत आहेत तेच खरं आहे असं आम्ही समजायचं का? असा सवाल शीतल म्हात्रे यांना अयोध्या पोळ यांनी केला आहे.