मुंबई : एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पुजाऱ्यानं त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना धक्कादायक घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे या पुजाऱ्यानं नंतर प्रेयसीचा मृतदेह मंदिराच्याच मागे पुरला होता. हा भयंकर प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. हत्या करणाऱ्या पुजाऱ्याचं नाव बुवा साई कृष्णा असून त्याच्या प्रेयसीचं नाव अप्सरा असं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्परा साई कृष्णासोबतच सुलतानपल्ली येथील एका गोशाळेत गेली होती. तिथे तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतर साई कृष्णाने अप्सराचा मृतदेह मंदिराच्या मागच्या बाजूस पुरला होता. विशेष म्हणजे खुद्द बुवा साई कृष्णा यानेच शक्कल लढवून पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अप्सराची मिसिंग कल्पेंट दिली होती. पण पोलिसांच्या तपासातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुजाऱ्यानं आपल्याच गर्लफ्रेंडची हत्या का केली? असा नेमका कोणता वाद त्यांच्यामध्ये झाला होता? यासह अनेक प्रश्नही उपस्थित केले जात होते. त्याबाबत ही धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
खरंतर साई कृष्णाचं आधीच लग्न झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे. नियमित दर्शनासाठी येणाऱ्या अप्सरा वर पुजाऱ्याचा जीव जडला होता अप्सरा वर आणि नंतर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि नंतर मात्र अस्परा लग्नासाठी वारंवार मागणी करून साईकृष्णावर दबाव टाकत होती.
साई कृष्ण बुवा चा मात्र लग्नाला नकार होता मग साई कृष्ण च मन भरलं होतं आणि म्हणून साई कृष्ण बुवा ने अप्सराला फायदेशीर वापरले आणि नंतर थेट वर पाठवलं असं सांगितलं जातं आहे.
दरम्यान आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण हा धक्कादायक प्रकरा समोर आल्यानंतर एकच खळबळ उडालीये,
आशा बाबांना हद्दपार करणं काळाची गरज आहे, कारण हे लोक धर्म आणि देवाच्या नावाखाली भोळ्या भक्तांना लुटून खात आहेत.