स्व. विनायकराव मेटे यांच्या पुतळ्यासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून द्या.
बीड : स्व. विनायकराव मेटे यांनी संपूर्ण आयुष्यभर वंचित, उपेक्षित व गोर – गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केलेला आहे. मराठा आरक्षणासह मुस्लीम व धनगर आरक्षणासाठी अधिवेशनात आवाज उठवत प्रसंगी त्यासाठी रस्त्यावरील व न्यायालयीन लढाई लढलेली आहे. अश्या या लोकनेत्याचा दुर्दवी शेवटही आरक्षणासाठीच झाला. बीड जिल्ह्यातील या भूमिपुत्राचा पुतळा बीड शहरात उभारण्यात यावा अश्या भावना विश्रामगृह बीड येथे संपन्न झालेल्या सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्याच्या बैठकीत अनेकांनी व्यक्त केल्या. त्या नंतर काल दि. ०९ रोजी सर्व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंढे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शासन स्तरावर पाठपुरावा करून पंचायत समिती, बीड येथील मोकळ्या जागेत लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांच्या पुतळ्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या कामास गती मिळावी याकरिता लवकरच शिष्टमंडळ मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे म्हंटले आहे. या प्रसंगी अनिल जगताप जिल्हाध्यक्ष, शिवसेना (ठाकरे गट)अशोक हिंगे,मराठवाडा अध्यक्ष, बहुजन वंचित आघाडी, रमेश पोकळे, प्रदेश उपाध्यक्ष किसन सेल भाजपा, प्रभाकर कोलगडे, शिवसंग्राम नेते, सचिन मुळूक जिल्हाप्रमुख (शिंदे गट), दिलीप गोरे, बीआरएस नेते, शेख शफिक, जिल्हाध्यक्ष, एमआयएम,शेख निजाम,अमर नाईकवाडे माजी नगरसेवक, रमेश चव्हाण राष्ट्रवादी नेते,
सुधीर काकडे, राजू जोगदंड आरपीआय नेते,बी. बी. जाधव, समन्वयक, मराठा क्रांती, बळीराम गवते मा.प.स. सभापती, अशोक ठाकरे,जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ, डॉ.प्रमोद शिंदे,समन्वयक, मराठा क्रांती,ऍड. मंगेश पोकळे,समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा,बीड जिल्हा,सुनील सुरवसे, शहराध्यक्ष, शिवसेना[ ठाकरे गट], ऍड.राहुल वायकर,विभागीय अध्यक्ष,संभाजी ब्रिगेड, शामराव पडूळे, उपसभापती, कृषी उत्पन्न
बाजार समिती, बीड,नितीन धांडे शिवसेना युवा नेते, अशोक तांगडे आरपीआय नेते,राजेंद्र बांगर बीआरएस नेते,अनिल घुमरे, जिल्हा सरचिटणीस,शिवसंग्राम, भास्करराव गायकवाड,सुनील अनभुले, रामनाथ खोड, विनोद चव्हाण,सुहास पाटील,मनोज जाधव, राजेश भुसारी,गोरख शिंदे,योगेश शेळके,संदीप नवले, बालाजी पवार, जयंत वाघ, विशाल हिंदोळे, गणेश काळे आदी. उपस्थित होते.