बीड : दोन दिवसांनी म्हणजे २० मे रोजी शिसवेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाप्रबोधन यात्रा आहे, महाप्रबोधन यात्रेच्या सभांची जिल्हास्तरावर होणारी ही शेवटची महाप्रबोधन यात्रेची सभा बीडमध्ये होते बाहे या महाप्रबोधन यात्रेला शिवसेना खासदार संजय राऊत सुषमा अंधारे यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
या सभेसाठी स्टेज उभारण्याचं काम बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाण माने कॉम्प्लेक्स या ठिकाणी केले जात होते यावेळी स्टेजची पाहणी करण्यासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा आंधारे या पाहणी करण्यासाठी आल्या होत्या शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात कार्यकर्त्यांना दम दिल्यावरून वाद झाला आणि गणेश वरेकर यांनी आप्पासाहेब जाधव यांना मारहाण केली.
हा वाद गणेश वरेकर यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून झाल्याचं बोललं जात आहे या वादामध्ये गणेश वरेकर यांनी आप्पासाहेब जाधव यांच्या चार चाकी कार सुद्धा फोडल्याचे समजते आहे.त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाप्रबोधन यात्रेला गालबोट लागले आहे असं म्हणणं चुकीचं नाही.