मुंबई : देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटका निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली आहे सर्वाधिक १३६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे, मात्र आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यांची उत्सुकता सर्वांना लागली आहे कर्नाटकात दोन राजकीय बलशाली असलेले दिन व्यक्ती आहेत ते म्हणजे सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार.
या राज्यात दोघांचही वर्चस्व मोठं आहे, मोठी लोकप्रियता आहे सिद्धरामय्या मुख्यमंत्री व्हावेत अशी त्याच्या गटाची इच्छा तर डी के शिवकुमार मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवकुमार यांच्या गटाची ईच्छा आहे आशा परिस्थितीत काँग्रेस पेचात पडलेली आहे दोनीही नेतृत्व काँग्रेससाठी महत्वाचे आहेत त्यामुळे कोणाला टाळायचं आणि कोणाला नाही ही परीक्षा काँग्रेसमोर आहे.
आज डी.के. शिवकुमार हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत, त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र डी. के.शिवकुमार यांनी याबद्दल मत व्यक्त करत असे म्हंटले आहे की मी कोणालाही ब्लॅकमेल करायला जात नाही मी माझ्या देवाला भेटायला जातोय असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
मात्र आता डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोघेही पावरफुल नेतृत्व असल्याने काँग्रेस या दोघांमध्ये टॉस करणार असून जो जिंकेल त्याला मुख्यमंत्री केलं जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे मात्र यावर काय निर्णय होणार याकडे देशच लक्ष लागलं आहे