बीड : स्वयंघोषित महंत मठाधीश बुवा खाडे महाराज हे नाव संबंध महाराष्ट्राला आता नावं नाही, त्याचं कारणही तसंच आहे
कारण हा ३७६ म्हणजे बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे आहे स्वतःला जरी तो मटाधीश किंवा कीर्तनकार किंवा बुवा म्हणून घेत असला तरी कायद्याच्या नजरेत आणि रेजिस्टवर आणि सर्वसामान्यांच्या नजरेत तो एक बलात्कारीच आहे.
या प्रकरणात तो फरार जरी असला तरी तो अधून मधून रात्री उशिरा गडावर येतो असे लोक सांगतात एकंदरीत खरं तर हा चोर पोलिसांचा खेळ गेल्या ८ महिन्यापासून सुरू असल्याचे आपल्याला पाह्यलामीळत आहेत
परिसरात तो कीर्तन करत असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे खरोखरच मठाधीश नराधम हा कीर्तन करतोय का याची शहानिशा करण्यासाठी मराठी महाराष्ट्र ची टीम परिसरात पोहोचली तिथे गेल्यानंतर हा डांबरोल पाहून आमच्याही डोळ्याचे पारणे फिटले
कारण गडावर असलेलं नैसर्गिक सौंदर्य पाहून कोणालाही भुरळ पडेल असा गडावरील परिसर आहे आणि याच परिसराचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा फायदा रंगेल बुवा खाडे याने घेतला आहे.
बुवा खाडे च्या लिंगपिसाट वागण्याने गडाच्या नेत्रदीपक रंगाचा बेरंग झाला आहे गड ओस पडला आहे, कधीकाळी या गडावर रात्रंदिवस भक्तांच्या रांगा असायच्या आज याच गडावर दूर दूर पर्यंत माणूस दिसत नाही, येथील पक्षांनी सुद्धा आपले मार्ग बदलले असल्याचं जाणवलं. सगळीकडे अगदी शुकशुकाट आहे येथील प्रसन्नता, सौंदर्य बुवा खाडे याने स्वतःच्या शरीरसुखासाठी हिरावुन घेतलं आहे.
विशेषता हा गड ऐका ओढ्यावर बसवला आहे, या गडाच्या स्थापणेपूर्वीचा मोठा खोडसाळ ईतिहास लोक सांगतात, ही जमीन खरंच त्या भुरट्या खाडे महाराजांची आहे की खाडे महाराजांनी जमीन ढापली हा तपासाचा भाग आहे मात्र एकंदरीत पाहता राजाच्या लंकेला ही लाजवेल असं वैभव या भुरट्या खाडे महाराजांने भक्तांना कष्टाच्या पैशाने उभा करून ठेवले आहे. त्याचा उपभोग बुवा खाडे आणि त्याचे चेले चपाटे घेत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून दैनंदिन अंध भक्त इथे येतात कोणी मूल होऊ दे म्हणून नवस बोलतो तर कोणी नवऱ्याची दारू सुटावी म्हणून, तर कधी कुणी नवरा बायकोचे प्रेम कायम राहूदे यासाठी आनाभाखा घालत होते, साकडे घालत होते, इथेच नारळ फोडले जातात नैवेद्य ठेवले जातात एवढंच नाही तर पैसे देखील ठेवले जातात आणि याच पैशातून उभारलेले हे भव्य साम्राज्य.मात्र हे साम्राज्य जनतेच्या पैशातून उभा केले मात्र तसूभरही जनतेच्या फायदयचे नाही तर तोट्याचे ठरले.
बुवा खाडे भक्तांना सांगायचा की मी अंतर्यामी आहे, मला सर्वकाही कळते, मी भक्तांच्या ईच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो, मला कोणीही रोखू शकत नाही अशी खोटी अश्वासन देऊन भक्तांना आर्थिक, मानसीक, धार्मिक आणि शारीरिक पद्धतीने लुटनारा बुवा आज फरार आहे का तर भक्त महिलेवर बलात्कार केलाय, यावरून एक प्रश्न पडतो की या बुवा खाडेची ती दैवीशक्ति कुठे आहे जीच्याजोरावर तो भक्तांना गंडवत होता. बुवा खाडे याने भक्तांचा विश्वास घात केला आहे, बुवा खाडे आणि त्याचे चेलेचपाटे पुन्हा गडावर डेरा मारून बसण्याच्या तयारीत आहेत त्यांनी आतापर्यंत गडाला दिलेल्या देणगीतून आलिशान गाड्या बंगले घेऊन, उधळण केल्याची कुजबुज जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यात सुद्धा आहे.
त्यामुळे हनुमान गडाच्या भक्तांनी आता जागे झाले पाहिजे, पुढे आले पाहिजे आणि बुवा खाडे ला गडावरुन कायमचं हद्दपार केलं पाहिजे,हा गड सर्वसामान्य कष्टकरी भक्तांचा गड आहे त्यावर बुवा खाडे किंवा त्याच्या चेल्याचपाट्यांचा काहीएक अधिकार नाही तो गड त्यांच्या ताब्यातून काढणं गरजेचं आहे.