मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आपल्याला माहीत आहे २०२१ साली मोठ्याप्रमाणात याबद्दल तुम्ही ऐकलं असेल शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान ला 2 ऑक्टोबर 2021 रोजी NCB ने अटक केली होती तब्बल २६ दिवसानंतर आर्यन खान ला मुंबई उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केला होता.
हेच प्रकरण आता समीर वानखेडे नामक अधिकाऱ्याच्या अंगलट आलं आहे. CBI ने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी झोनल डायरेक्टर Sameer Wankhede समीर वानखेडे यांच्या मुंबईतील निवासस्थानावर तब्बल १३ तास छापा टाकला.
सीबीआयच्या १२ अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता समीर वानखेडे यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी पोहोचले आणि शनिवारी पहाटे साडेपाच वाजता छापा संपवला. सीबीआयने त्याच्या घरातून प्रिंटरसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. सीबीआयने अद्याप या कारवाईचा तपशील प्रसारमाध्यमांसोबत शेअर केलेला नाही.
२ ऑक्टोबर २०२१ रोजी, समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली NCB पथकाने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डिलिया क्रूझवर छापा टाकला. यादरम्यान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे यांच्या पथकाने छाप्यात पकडलेल्या अनेकांना सोडून देण्यात आले आणि आर्यन खानच्या सुटकेसाठी खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
त्यावेळी आर्यन खान वर गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि ५० लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र पुराव्याअभावी आर्यनला नंतर जामीन मंजूर करण्यात आला. या आरोपांच्या चौकशीसाठी एनसीबीने एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीच्या तपासात समीर वानखेडे यांच्या पथकाचा भ्रष्टाचार समोर आला असून त्याआधारे सीबीआयने समीर वानखेडेसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे आर्यन खान प्रकरण समीर वानखेडे यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे.