रत्नागिरी : मागील चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा शरद पवार यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती, कार्यकर्ते भावुक झाले होते तर अजित पवार कार्यकर्त्यांना दम देत होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, आता मात्र शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला आहे आता ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, त्या राजीनामा नाट्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधान केलं असून त्यामध्ये अजित पवार यांना टार्गेट केलं आहे, अजित पवार यांची मिमिक्री करून खा पवार यांनी राजीनामा का मागे घेतला याचं कारण राज ठाकरे यांनी सांगितले आहे..
ते म्हणाले ज्यावेळी खा शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी जो गोधळ पक्षात उडाला त्यावेळी समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवार दम देत होते, ‘ये तू गप्प बस रे’, ‘ये तू खाली बस रे’, ‘ये थांब रे’ शरद पवार समोर बसलेले असताना अशाप्रकारे ते बोलत होते आणि तेव्हा खा.शरद पवार यांना वाटलं असेल की मी आत्ताच राजीनामा दिला तर हा एवढा दम देतोय उद्या हा मलाही म्हणले ‘तू गप्प बस रे’ म्हणून राजीनामा पवारांनी मागे घेतला असावा असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे, कोकणातील जाहीर सभेत शनिवारी ते बोलत होते.