मुंबई : मागील काही महिन्यांपूर्वी शिवसेना फुटली उद्धव ठाकरे यांची वाताहत शिंदे यांनी केली मात्र उद्धव ठाकरे ( udhav thackeray ) यांना जनतेने मोठा दिलासा दिला आहे, शिंदेंनी ४० आमदार नेले मात्र ठाकरेंचं पानिपत होते की काय आशा चर्चा रंगू लागल्या त्यानंतर ठाकरे नेहमी म्हणत की आमदार नेले मात्र जनता माझ्यासोबत आहे आणि तस घडलं.
मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार bjp सोबत जाणार अश्या बातम्या आल्या त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत असे सांगितले की मी कुठेही जात नाही मात्र अंतर्गत अशी चर्चा आहे की राष्ट्रवादीच्या आमदारांची जुळवाजुळव झाली नाही त्यामुळे सर्वकाही रद्द झालं.
आज मात्र खा. शरद पवार ( shardad pawar ) यांनी सर्वांची झोप उडवली आहे, आज त्यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकाचे अनावरण होतं त्यावेळी बोलत असतांना त्यांनी अचानक असे विधान केले की मी राष्ट्रवादी पार्टीच्या अध्यक्ष ( nationalist congress party president ) पदाचा राजीनामा देतोय आणि त्यांनतर सर्वांची धुडधुडी वाढली.
शरद पवारांच्या या निर्णयामुळे राज्यातील कार्यकर्ते पदाधिकारी भावनिक झाले असून ते धायमोकलून रडू लागले आहेत खा पवारांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी विनवणी केली जात आहे.
राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनी शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली आहे मात्र अजित पवार ( ajit pawar ) हे मात्र खा पवारांच्या या निर्णयावर अजित पवार म्हणाले की वयानुसार अध्यक्ष बदल होणे गरजेचे आहे त्यावर अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याशिवाय राजकिय वर्तुळात अशीही चर्चा आहे की अजित पवार यांनी मागील काही दिवसापूर्वी जो राष्ट्रवादी सोडण्याचा बातम्या आल्या होत्या शिवाय अंतर्गत कुजबुज अशी होती की अजित पवार जाणारच होते आणि त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा असा निर्णय घेऊ नये म्हणून खा. शरद पवार यांनी अजित पवार यांना ओहोर डोस दिला असावा किंवा राष्ट्रवादी मध्ये काही फुटाफुटी होऊ शकते का याची चाचपनी करायची असावी अशी म्हणून शरद पवार यांनी असा निर्णय घेतला असावा शेवटी पावरच अध्यक्ष राहतील असा विश्वास जेष्ठ नेते प्रफुल पटेल ( praful patel ) यांनी सांगितले आहे.