ब्युरो रिपोर्ट | डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हंटलं की फक्त दलितांनी त्यांना अभिवादन करायच आणि इतरांनी त्यांना फक्त त्यांना ओळखायचे त्यांनी काय केलं हे फक्त मनात ठेवायचे आणि जातीच्या चौकटीत बांधून ठेवायचं,मात्र अलीकडच्या काळात मोठ्याप्रमाणात बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
याला फार मोठं करण आहे की अलीकडच्या काळात गावच्या गल्ली पासून ते दिल्लीत बसलेल्या राजकारण्यांनी सत्तेचा इतका उपभोग घेण्यास सुरुवात केली आहे की सामान्य जनतेचं नुसतं शोषण होत आहे, आणि मग सामान्य लोकांना आपले हक्क अधिकार काय आहेत ते शोधण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना भारतीय संविधान आठवले आणि बाबासाहेबानी ज्या तरतुदी मानव,जीवनासाठी, जनहितासाठी सत्ताधाऱ्यांना जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम वाचल्यानंतर लोक बाबासाहेब,शिवराय,जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीमाई, यांना ओळखायला लागली आणि परिवर्तन होतांना आपल्याला दिसू लागले.
बाबासाहेबांची जयंती म्हंटलं की फक्त दलितांनी साजरी करायची त्यांचा फोटो फक्त त्यांनीच घरात लावायचा इतरांनी फक्त त्यांना आठवणीत ठेवायचं मात्र मागील 7 वर्षात देशातील काही ठराविक वर्ग सोडला तर सर्वांना बाबासाहेब चांगलेच आठवत आहे.
ज्यांनी पूर्वीपासून बाबसहेबांचे विचार आत्मसात केले ते लोक आजही त्या मार्गावर आहेर त्यात संभाजी ब्रिगेड या संघटनेचा प्रकर्षांने उल्लेख केला जाऊ शकतो.
काल दि.१४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३२ वि जयंती साजरी केली तेव्हा संपूर्ण जातीधर्माच्या चौकटी मोडून लोकांनी बाबासाहेबाना अभिवादन केलं मात्र त्यामध्ये एक सोशलमीडिया फेसबुक पोस्ट फार व्हायरल झाली ती अतिशय महत्वाची आहे.
संभाजी ब्रिगेड च्या ऐका लढवय्या मावळ्यांने ही पोस्ट केलीय ती संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होतेय ती जशास तशी तुम्हाला वाचकांना ‘मराठी महाराष्ट्र’ सादर करत आहे
#साहेब_मी_मराठा_आहे..
साहेब मी #मराठा आहे, आणि मी आपल्या विचारांपुढे आणि जीवन संघर्षापुढे नतमस्तक आहे.! #प्रस्थापितांचा प्रचंड पगडा असणार्या आणि ठराविक लोकांची #मक्तेदारी असणार्या या #समाजात आपण निर्माण केलेलं स्वतःचं अस्तित्व आजही अनेक पिढ्यांना #लढायला शिकवतंय.! आजपर्यंत या समाजात दखल घेतली गेली ती प्रस्थापितांची.पण उपेक्षित मग तो कोणत्याही समाजाचा असो त्यालाही मान, सन्मान आणि प्रतिष्ठा असते हे प्रस्थापितांना ठणकाऊन सांगणारे महामानव म्हणजे आपण अर्थात विश्वरत्न ज्ञानरत्न वंदनीय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर होय..!!
#राजेशाही गेली आणि #लोकशाही आली. पारतंत्र्य सुद्धा संपले पण आपल्याच देशात आपल्याच लोकांना माना सन्मानाने जगता येऊ नये ही किती मोठी #शोकांतिका आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण इथल्या समाजव्यवस्थेशी दिलेला #लढा समाजातील उपेक्षितांना न्याय मिळवून देणारा ठरला! आपण दिलेली #विचारांची_शिदोरी आज अनेकांना #दिशा देण्याचं काम करतेय, जन्माला तर सगळेच येतात पण खऱ्या अर्थानं आपला जन्म उपेक्षित लोकांसाठी खर्च करून आपण या सर्वांचे #साहेब झालात.संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवून अनेकांना सुखाचा रस्ता दाखवलात आपण आणि तुमच्यामुळेच आज #लढायला_बळ येतं साहेब. प्रस्थापितांची धुणी धुण्यात धन्यता मानन्यापेक्षा आयुष्यात एक दिवस जरी आपल्या विचारांवर जगता आलं तरी आयुष उजळल्या शिवाय राहणार नाही.!
अस्तित्वाचा लढा हा जिवंत राहण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो ही आपली शिकवण सदैव लढण्याची प्रेरणा देत राहते…!
#जय_जिजाऊ_जय_भीम ..
संतोष शकूंतला आत्माराम बादाडे
अशी या मराठा तरुणाची ही पोस्ट महाराष्ट्रात व्हायरल झाली ज्यामुळे उद्याचा मराठा यावर पुन्हा पुन्हा विचार करेल की हे बोलला त्यावर आपणही आता विचार करायला हवा आणि बाबासाहेब कोण? त्यांनी तुमच्या आमच्यासाठी काय केले यावर चिकित्सा होणं गरजेचं आहे त्यामुळे कालची जयंती ही सार्थकी ठरली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
येणाऱ्या काळात हे विचार देशासाठी प्रेरणादायी ठरतील आणि त्या मार्गाने बहुजन समाज चालेल आणि त्याचा फायदा देशहितासाठी होईल. तर दुसरीकडे याचा तोटा राजकारण्यांना होईल त्यामुळे अशा पोस्ट करणाऱ्यांचा कटाक्षाने पाहिले जाईल मात्र तो संभाजी ब्रिगेड चा संतोष बादाडे असेल तर तो संतोष कोणत्याच राजकारण्याला घाबरणार नाही हे ही तितकेच खरे आहे.