बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंती निमित्त बीड शहरातील नगर परिषदे समोरील पंचशील हॉस्पिटल येथे डॉ. प्रवीण वाघमारे व डॉ. दिपाली वाघमारे. या दांपत्याचा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कोषाध्यक्ष व समता सैनिक दलाचे अमरसिंह ढाका प्रा. वसंत ओगले यांच्या हस्ते त्यांना पंचशील ध्वज असलेल्या पट्टाची टी-शर्ट देऊन गौरव सन्मान करण्यात आला , अशा पद्धतीने समाजकार्य केल्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून कौतुक व सन्मान होत आहे. या कार्यक्रमात स्वतःहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन पर आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये अनेकांनी लाभ घेतलाय अशी माहिती डॉ. वाघमारे यांनी सांगितले त्याबद्दल त्यांचा सत्कार व गौरव करण्यात आला यावेळी पंचशील हॉस्पिटल कामगार व बाहेरून आलेले पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.