मुंबई : नेहमी मोदींची हुबेहूब नक्कल करून भारतियांना हसवणाऱ्या शाम रंगीलावर राजस्थान शासनाने कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी शाम रंगीला ने राजस्थान येथील ऐका जंगलात जाऊन तेथिल नीलगायीला काही पदार्थ खाऊ घातले होते, त्याचं चित्रीकरण केलं होतं त्यामुळे शाम रंगीला वर वायन्यजीव सरंक्षण कायद्याखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
राजस्थान प्रशासनाचे म्हणणे आहे की वन्य प्राण्यांना आपले पदार्थ पचन होत नाहीत, त्यांची प्रकृती बिघडते त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
त्याचाच फटका शाम रंगीला यांना बसला शाम रंगीला याना ११ हजार रु दंड भरावा लागला आहे त्यावर शाम रंगीलाने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आपली ती चूक होती हे मला मान्य आहे असंही शाम रंगीला यांनी म्हटलं आहे. कायदा सारखा आहे मात्र मोदी जेव्हा प्राण्यांना पदार्थ खाऊ घालतात त्यांच्याबरोबर फोटो काढतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई होत नाही, मात्र आम्ही फोटो काढला की लगेच कारवाई होते असं शाम रंगीला ने म्हंटलं आहे.