बीड : टीईटी सक्ती व इतर मागण्याच्या अनुषंगाने ५ डिसेंबर २०२५ रोजी पुकारण्यात आलेल्या शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भात मुप्टा शिक्षक संघटनेने पाठिंबा दिलेला आहे .या शाळा बंद आंदोलनामध्ये संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिक्षकांनी सहभागी होऊन एकजूट दाखवावी असे आवाहन मुप्टा शिक्षक संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शरद मगर यांनी केले आहे. सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण अट रद्द करण्यात यावी,१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयातील अन्यायकारक निर्णय व त्याचे निकष लावून केलेले समायोजन रद्द करण्यात यावे.विद्यार्थी संख्या २० पटाच्या आतील शाळा बंद करण्यात येऊ नयेत. या धोरणामुळे शिक्षक मोठ्या संख्येने अतिरिक्त होत आहेत. जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळा बंद पडत आहेत. राज्यातील शिक्षकांना १०,२० व ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी शिक्षकांचे सर्व थकीत वेतन देयके व वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके तात्काळ देण्यात यावेत या सर्व मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने शाळा बंद आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनास बीड जिल्हा मुप्टा शिक्षक संघटनेचा पाठिंबा आहे बीड जिल्हाध्यक्ष शरद मगर जिल्हा सचिव प्रा शशिकांत जावळे,कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे,प्रा.नारायण घोलप प्रा.संजय बागुल,प्रा बाळासाहेब गव्हाणे ,प्रवीण तरकसे,श्रीकांत वारभुवन ,प्रमोद साळवे ,शैलेश चिलवंत, अमोल राऊत,अमित वाघमारे यांनी केले आहे.
















