मुंबई : पंकजा मुंडेचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप गर्जे कुटुंबावर आत्महत्या केलेल्या अंतर गर्जे यांच्या पत्नीच्या कुटु्ंबीयांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करत मुलीचे कुटुंबीय वरळी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत अशी माहिती आहे. दरम्यान, मयत मुलीचे कुटुंबीय गुन्हा दाखल व्हावा यासाठी आग्रही आहेत. मुलीच्या मृतदेह रुग्णालयात असून त्यावर शवविच्छेदन केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. मागील फेब्रुवारी महिन्यात त्यांचे लग्न झाले होते.
या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. जेव्हा शवविच्छेदन होईल सत्य बाहेर येईल, दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अनंत गर्जे यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाले होते, या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांत अनंत गर्जेंच्या पत्नीने टोकाचे पाऊल का? उचलले. त्यांनी आत्महत्या केली? की त्याची हत्या आहे? असा सवाल उपस्थित होतोय, दरम्यान तिच्या माहेरच्या लोकांना वरळी पोलिस ठाण्याला घेरावा घातला. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
















