बीड : नगर परिषद निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून बीड नगर परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती समूहाच्या महिलांसाठी जाहीर झाले आहे. अध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित असल्यानं पुरुषाचं काहीच चालत नाही मात्र नेते शक्कल लढवतात कोणी आपल्या आईला पुढे करतो तर कोणी पत्नीला पुढे करतो, कोणी कुटुंबातील व्यक्तीला पुढे करतो आणि निवडणुकीला सामोरे जातो, पैसा मुबलक असेल तर तो जनतेत टिकतो सुद्धा. आता या निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांच्या महिला उमेदवार असतील कोणाची पत्नी असेल कोणाची आई असेल अशा प्रकारचे उमेदवार येणाऱ्या काळात निवडणूक रिंगणार असतील. सध्या सोशलमिडिया आणि प्रसार माध्यमांवर चर्चेत असणारी आम्रपाली साबळे नावाची ऐक महिला जिने प्रसिद्धी पत्रकाद्वारे बीड शहरातील नागरिकांना काही सवाल केले आहेत.
त्यांनी प्रसिद्धी पत्रकार असे म्हटले आहे की बीड नगर परिषद अध्यक्ष पदाची उमेदवार महिला ही चूल आणि मूल बघणारी नको, तिला शहराचा इतिहास माहिती असायला हवा, शहराच्या प्रभाबद्दल माहिती असावी, शहरातील महिलांच्या समस्या काय आहेत? याची माहिती असायला हवी, शहरात किती महिला स्वच्छता गृह आहेत याची माहिती असायला हवी, शहरात पाणी, वीज, स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा मिळतात का याची माहिती असायला हवी. अशाच महिलेला संधी द्या जी महिला घराचा उंबरा ओलांडत नाही तीला शहराच्या प्रश्नाबद्दल काय माहिती असणार आहे. तिला नगर परिषद कार्यालय कुठे आहे? जिल्हाधिकारी कार्यालय कुठे? समाजकल्याण कार्यालय कुठे आहे? दारूबंदी कार्यालय कुठे आहे? शहरात पोलिस ठाणे किती? आणि ते कुठे कुठे आहे? नगर परिषद कार्यालय कुठे आहे त्यात कोणकोणते विभाग असतात याची माहिती तिला असली पाहिजे तीच खरी उमेदवार आहे. पत्नी नावाला नगराध्यक्षा आणि कारभार पती हकणार हे चालणार नाही. मला संधी द्या मी गेली अनेक वर्षे सुशिक्षित, बेरोजगार, शोषित पिढीताना न्याय देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. मी एकमेव महिला अशी आहे जी समाजहित जपणारी, गोरगरिबांसाठी लढा उभारणारी, अन्याय आत्याचाराच्या विरोधात आंदोलनं उभारणारी, कोणाच्याही दबावाला बळी न पडणारी ऐक सक्षम उमेदवार आहे.मी दिवसातील १० तास लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी घराबाहेर आहे, कोणी त्या नेत्याची पत्नी आहे म्हणून, सक्षम उमेदवार आहे असे म्हणत असेल तर ते योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, आणि त्यांना स्वतः प्रशासन चालवण्याची माहिती व्हावी, त्यांनी प्रशासन चालवावं म्हणून ती संधी उपलब्ध करून दिली आहे, ती यासाठी नाही की तिच्या पतीने कारभार चालवावा. त्यामुळे बीड शहरातील नागरिकांना माझे नम्र आवाहन आहे तेच-तेच लोकं पर्याय काढून सत्तेत राहत आहेत त्यामुळे सरशहराचा विकास खोळंबला आहे तुम्ही माझ्यासारख्या ऐका सामान्य कुटुंबातील महिलेला संधी द्या मला नगराध्यक्ष करा पुढील दोन वर्षात बीड शहराचा चेहरा मोहरा बदनूक टाकते असे आम्रपाली साबळे यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.

















