बीड : OBC नेते लक्ष्मण हाके पुन्हा इस्टॅब्लिश झाले दीड आहेत. दीड वर्षांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन टिकून आहे, सुरुवातीची मागणी मराठवाड्यापूर्ती होती मात्र ती मागणी रेटून महाराष्ट्रभर नेण्यात आली. दोन वेळा मुंबईत जाऊन आरक्षणाचा जीआर मनोज जरांगे घेऊन आले ते दोनही GR फसवे आहेत. मराठा समाजाला त्या GR मध्ये काहीच मिळालं नाही असं घटना तज्ञांचं आणि आरक्षणामध्ये कायदेशीर लढाई लढणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे.
मात्र मनोज जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे 58 लाख नोंदी सापडल्या आणि त्याआधारे चार कोटी मराठे आरक्षणात गेले आहेत असे ते म्हणतात. मात्र वास्तवात फक्त 23 हजार इतक्या नोंदी सापडल्या आहेत आणि त्यानुसार दोन ते अडीच लाख मराठे कुणबी झालेले आहेत उर्वरित कोट्यावधी मराठ्यांचं काय? असा नेहमी सवाल उपस्थित केला जातो 2 सप्टेंबर चा जीआर मुंबईमध्ये निघाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मराठ्यांनी गुलाल उधळला मात्र तोच GR सुद्धा फसवा असल्याचं सांगितलं जातंय मात्र याच जीआरच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पॉप्युलर झालेत.
ओबीसींच आरक्षण संपलं असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे जो जीआर निघाला त्या जीआर च्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये ओबीसींचा आरक्षण संपले असं लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने यांचे म्हणणे आहे. त्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये स्पष्ट सांगितलाय की ज्यांच्या नोंदी नसतील त्यांनी शपथपत्र घ्यायचं आणि कुणबी प्रमाणपत्र मिळवायचं म्हणजे बनावट प्रमाणपत्र निघतील आणि त्यामुळे तमाम ओबीसींच आरक्षण संपलंय असा सूर लक्ष्मण हाकेंनी धरलेला आहे.
आणि त्यावरून लक्ष्मण हाके यांना पुन्हा एकदा समाजाची सिंपत्ती मिळत आहे. काल गेवराई तालुक्यातील शृंगार वाडी या ठिकाणी लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली भव्य OBC समाजाची सभा आयोजित करण्यात आलेली होती, आणि या सभेला हजारोंची संख्या होती या सभेत बोलत असताना लक्ष्मण हाके यांनी गेवराई विधानसभा मतदारचे अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर तोफ डागली. विविध प्रकारच्या शब्दप्रयोगांनी खिल्ली उडवत विजयसिंह पंडित यांना टार्गेट केल.
येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघून घेऊ असाही दम लक्ष्मण हाके यांनी भरला. गेवराई मतदार संघामध्ये ओबीसींचे मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले. बीड जिल्ह्यात गेवराईच्या पंडित घराण्याला ‘पंडित’ म्हणायला घंटा लागतो मात्र लक्ष्मण हाके यांनी गेवराईत येऊन पंडितांनाची खिल्ली उडवत आव्हान दिले आहे अशी चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या जीवावर गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ. विजयसिंह राजे पंडित यांना आव्हान दिलय आता आ. विजयसिंह पंडित नेमकं उत्तर काय देणार? त्याचबरोबर गेवराई मधील ओबीसी समाजाची कशी समजून काढणार? हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे.