बीड : गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांची आत्महत्या झाल्याची बातमी महाराष्ट्रात सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत, गोविंद बर्गे यांच्याकडे कुठल्याही प्रकारची बंदूक नव्हती असा दावा नातेवाईकांकडून केला गेला आहे. गोविंद बर्गे यांना हत्या करून तिथं आणून ठेवलं का? असा सवाल उपस्थित झालाय. गोविंद बर्गे हे दारू पित नव्हते तिथे दारू च्या बाटल्या आणून ठेवल्या असाही आरोप नातेवाईक करत आहेत.
गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड या दोघांमध्ये प्रेम संबंध होते असं स्वतः पूजा गायकवाड हिने सांगितले आहे. पूजा गायकवाडला बार्शी न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे, आणि या पोलीस कोठडी मधल्या चौकशी दरम्यान पूजा गायकवाड न काही माहिती दिली आहे. गोविंद बर्गे यांचा मृत्यू झाला त्यादिवशी त्या परिसरामध्ये पूजा गायकवाड होती का? असा विचारल्यानंतर मी त्या परिसरामध्ये नव्हते अशी अशी कबुली पूजा गायकवाड न दिली आहे. पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे मृत्यू प्रकरण हे नेमकं काय आहे हे कोड अद्याप उलगडलेलं नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नेमकं काय घडतं? हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गोविंद बर्गे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली, तेव्हा पूजा गायकवाड घटना परिसरात नसल्याचं समोर आलं आहे. पूजा सासुरे गावात नव्हती. त्यावेळी पूजा कला केंद्रात रात्रभर होती. पूजाचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद हे गेवराईहून बार्शीतील वैरागजवळ आले. गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते.सध्या पोलिसांकडून कॉल लॉग तपासले जाणार आहे. सध्या पोलिसांकडून सगळ्या बाजूनं पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कोण आहे पूजा गायकवाड ?
पूजा ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या सासुरे गावातील रहिवासी आहे. ती बार्शी तालुक्यातील थापडीतांडा या गावातील कलाकेंद्रात जात असल्याची माहिती आहे. याच ठिकाणी गोविंद आणि पूजाची भेट झाली. यानंतर पूजा पारगाव कला केंद्रात गेली. गोविंद वारंवार पूजाची भेट घेण्यासाठी कला केंद्रात जात असे. मैत्रीचं रूपांतर प्रेमात बदललं. नंतर गोविंद तिला महागडे वस्तू देऊ लागल्या.