उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे बेपत्ता असल्याच्या बातम्या येत आहेत, ते राज्य सभेचे सभागृहाचे अध्यक होते पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते गायब आहेत अशा बातम्या वजा अफवा पसरल्या आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. जगदीप धनखड नेमके कुठे आहेत हे देशात सांगा अशी म्हणी अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत
सांसद (राज्यसभा)
नेता, शिवसेना संसदीय पक्ष दिनांक: १० ऑगस्ट २०२५
प्रति, श्री अमित शहा जी
माननीय गृहमंत्री
भारत सरकार
नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली
माननीय गृहमंत्री महोदय,
जय हिंद!
मी हे पत्र एका विशेष कारणासाठी लिहीत आहे, जे राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यक्तीस्वातंत्र्याशी संबंधित आहे.
२१ जुलै रोजी संसद अधिवेशन सुरू झाले. सकाळी ११ वाजता राज्यसभा सभापती व उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांनी कार्यवाहीला प्रारंभ केला.
सत्रादरम्यान ते नेहमीप्रमाणे सामान्य दिसत होते आणि कार्यवाही नेहमीसारखीच चालवली.
सत्रात त्यांचा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी तोंडी वाद झाला, त्यानंतर सभागृहाची कार्यवाही त्या दिवसासाठी तहकूब करण्यात आली. यावरून त्या वेळी सभापतींची प्रकृती ठिक असल्याचे दिसते.
मात्र त्याच दिवशी सायंकाळी ६ नंतर अचानक बातमी आली की उपराष्ट्रपतींनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही गोष्ट सर्वांसाठी धक्कादायक होती.
याहूनही अधिक धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे २१ जुलैपासून आजपर्यंत उपराष्ट्रपतींच्या ठिकाणाविषयी किंवा प्रकृतीविषयी कोणतीही माहिती नाही. ते सध्या कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? या बाबींवर अजूनही स्पष्टता नाही. राज्यसभेतील काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले. त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणतेही संवाद झालेले नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
आपल्या उपराष्ट्रपतींना नेमकं काय झालं आहे? ते कुठे आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? ते सुरक्षित आहेत का? या प्रश्नांची खरी माहिती देशाला मिळायला हवी.
दिल्लीमध्ये अशा अफवा पसरत आहेत की श्री. धनखड यांना त्यांच्या निवासस्थानीच रोखण्यात आले आहे आणि ते सुरक्षित नाहीत.
काही राज्यसभेतील सहकारी सदस्य तर सर्वोच्च न्यायालयात हॅबियस कॉर्पस याचिका दाखल करण्याचाही विचार करत आहेत, कारण आम्हाला त्यांच्या ठिकाणाविषयी आणि ते सुरक्षित व निरोगी आहेत की नाही याविषयी खरी चिंता आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यापूर्वी मला वाटले की, ही माहिती तुमच्याकडून घेणे योग्य ठरेल. मला आशा आहे की आपण माझ्या भावना समजून घ्याल आणि श्री. धनखड यांच्या सध्याच्या ठिकाणाविषयी, त्यांची सुरक्षितता आणि प्रकृती याबाबत खरी माहिती द्याल.
धन्यवाद, आपला विश्वासू, (संजय राऊत)
अशी मागणी खा. संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान जगदीप धनखड हे खरंच कैदेत आहेत का असा विचारला जाऊ लागला आहे.