बीड : धनंजय नागरगोजे गेली 18 वर्षापासून आश्रम शाळेवर मोफत नोकरी करत होते मात्र पगार नाही आणि कुटुंबाच्या उपजीविकेच काय हा प्रश्न धनंजय नागरगोजे यांना नेहमी सतावत होता.
संस्थाचालकाला पगार मागितला संस्था चालकाने आत्महत्या करायला सांगितले म्हणजे विक्रम मुंडे यांना मला १८ वर्षापासून पगार नाही माझ्या कुटुंबाचं काय? असा सवाल केला असता धनंजय नागरगोजे यांना विक्रम मुंडे यांनी सरळ सांगितलं की तू फाशी घे. आणि मग मी दुसरा कर्मचारी लावायला मोकळा आणि तू या त्रासामधून मोकळा असा सल्ला विक्रम मुंडे यांनी दिला.
सगळ्या गोष्टी ऐकून धनंजय नागरगोजे यांनी विक्रम मुंडे यांच्या बँकेच्या शेजारी म्हणजे कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शेजारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यानंतर धनंजय नागरगोजे यांनी विनाअनुदानित शाळेवर नोकरी केली आहे आणि संस्थेला अनुदान नसल्यामुळे त्यांचा पगार झाला नाही आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केली असं स्टेटमेंट विक्रम मुंडे यांचे पुत्र विजयकांत मुंडे यांनी दिलं होतं. आणि त्यांनी सरळ हात झटकले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर आणि सभागृहामध्ये हे प्रकरण गाजल्यानंतर सहा जणांच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवर्त केल्याप्रकरणी ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्यामध्ये त्यांना सजा होऊ शकते मात्र अटक झाले तर. मात्र जर आरोपी अटकच होणार नसतील तर सजा कोणाला द्यायची? हा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे धनंजय नागरगोजे यांना न्याय द्यायचा असेल तर हे आरोपी अटक होणे गरजेचे आहे. नुसते गुन्हे दाखल करून चालणार नाही तर या सहाही जणांना बीड पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशा प्रकारची मागणी जनसामान्यांच्या वतीने केली जात आहे.