बीड : केज तालुक्यातील देवगाव येथील रहिवाशी असलेल्या धनंजय नागरगोजे यांनी फेबूक पोस्ट लिहून पगार नसल्याने कंटाळून जीवनयात्रा संपवली आहे. विक्रम बाबुराव मुंढे यांच्या शाळेवर धनंजय नागरगोजे हे गेली १८ वर्षांपासून मोफत शिक्षण सेवा देत होते. पगार दिसला जात नसल्याने कुटुंबाच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा राहिला आणि अखेर धनंजय नागरगोजे यांनी आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला पोस्ट लिहून या जगाचा निरोप घेतला.
नागरगोजे यांनी विक्रम मुंडे यांना वारंवार पगारासाठी विनंती केली मात्र यश आले नाही विक्रम मुंडे यांनी आत्महत्या करण्याचा पर्याय धनंजय नागरगोजे यांना दिला आणि शेवटी नागरगोजे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बीड जिल्ह्यातील वंजारी समाजाचे नेते निवडणुका आल्या की जातीचे राजकरण खेळतात आणि निवडणुका जिंकतात इकडे बळी मात्र सामान्य माणसाचा जातो आणि धनंजय नागरगोजे यांचा बळी सुद्धा राजकीयच आहे.
मागील तीन महिन्यापूर्वी घडलेले देशमुख हत्या प्रकरणाला जातीचे वळण लागले मान्य आहे मात्र तुमच्या शब्दात सांगायचं झालं तर धनंजय नागरगोजे हा तुमच्याच जातीचा माणूस होता ना मग त्याला न्याय देण्याची जबाबदारी कोणाची?
पंकजा मुंडे नेहमी म्हणतात मी समाजाची माय आहे समाज माझं लेकरू मग त्याच समाजातील एक निष्पाप जीव गेला त्याला जबाबदार कोण? तुमचाच निकटवर्तीय विक्रम मुंडे.
काल आपल्या तीन वर्षाच्या चिमुरडीला पत्र लिहिणारी फेसबुक पेस्ट करून धनंजय नागरगोजे यांनी महाराष्ट्राला रडवले इकडे मात्र बीडमधील समाजाच्या जीवावर राजकीय पोळी भाजून चुरून, ओरबाडून, ओरपून खाणाऱ्या आ. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, आ. धनंजय मुंडे, आ.नमिता मुंदडा, खा. बजरंग सोनवणे यांपैकी एकही नेत्याने या दुर्दैवी घटनेची पोस्ट केली नाही त्याचे कारण काय? आम्ही जाणतो.
जर त्याच्या आत्महत्येची पोस्ट केली तर दोषींवर कारवाई करण्याची मागणी करावी लागेल आणि कारवाई करण्याची मागणी केली तर आपला निकटवर्तीय संस्थानिक राजकीय बळ देणारा विक्रम मुंडे सारखा नेता गमवावा लागेल म्हणून पोस्ट ही करायची नाही कारवाई ची मागणी करायची नाही हा निश्चय या लबाड नेत्यांनी केलेला उघड दिसतोय.
कारण विक्रम मुंडे आपल्याला कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबीयांची मतं देतो आत्महत्या करणारा धनंजय नागरगोजे प्रश्नाशिवाय दुसरं काय देऊ शकतो? याचे गणित ह्या नेत्यांनी मांडून घेतलं आहे.
मी समाजाची समाज माझा आणि ह्यांच्या चुकांमुळे ह्यांनी पराभूत व्हायचं आणि आत्महत्या समाजाच्या तरुणांनी करायच्या हा सगळ्यात मोठा किती हा चिंतनाचा विषय आहे.
वंजारी समाजाने फक्त मुंडेना मते देण्यासाठी जन्म घेतलाय का?
बीड जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या माणसांचा जन्म फक्त मुंडेना मते देण्यासाठी झाला आहे का? असा सवाल नेहमी उपस्थित होतो उत्तर नेहमीं तेच येते की हो आम्ही मुंडेंचे बांधील आहोत बाकी कोणाचे नाही. अहो मते द्या मात्र तुमच्या भविष्याचे काय याचा विचार कधी नेत्यांनी केलाय का? त्यांनी फक्त वेळप्रसंगी हाकलून दिले, दूर लोटले, कामापुरते वापरून घेतले तरी चालते.
समाजाच्या लोकांनी अपेक्षा काही करायच्या नाहीत मतं द्यायची नेता आला की बेंबीच्या देठापासून घोषणा द्यायच्या, उन्हातान्हात दसरा मेळाव्याला जायचं यापेक्षा काय मिळालं आजपर्यंत समाजाला? काहीच नाही.
जो अशा जाचक रुढीला विरोध करतो त्याचा नामोनिशाण मिटून जातो ज्यांना गुलामी करायची त्यांनी बंगल्याच्या आणि गाडीच्या मागेपुढे गिरक्या घ्यायच्या यापेक्षा समजला काय मिळाले? काहीच तर नाही धनंजय नागरगोजे यांना मृत्यू मात्र मोफत मिळाला.
जिल्ह्यात एक विक्रम मुंडे आणि विजय गोल्हार पोसला की झाले!
बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्याच्या पंचायत जिल्हा परिषद गटात एक विजय गोल्हार आणि एक विक्रम मुंडे पोसायचा आपसात त्यांना भिडवायचे जो निवडून येईल त्याला रसद पुरवायची आणि मग ते समाजाला आणि जनतेला लुटून खातील आपल्याही देईल. आम्ही कारखान्याच्या वेळी लाखोंचे चेक प्रतिष्ठानच्या नावे आलेले पाहिले आहेत. अशी ही कूटनीती ह्या नेत्यांनी आजपर्यंत वापरली आणि समाजाचा उपभोग घेतला आहे. समाजाने वेळीच जागं होणे गरजेचे आहे प्रत्येक कुटुंबात एकाचा धनंजय नागरगोजे होण्यापासून वाचवायचा असेल तर सत्तापिपासू समाज आणि जनतेच्या रक्त शोषणाऱ्या गोचडासारख्या नेत्यांना त्यांची जागा दाखवा. समोरासमोर तोंडावर बिनधास्त जाब विचारा काहीही घाबरू नका तरच तुमच्या लेकरांच भविष्य उज्वल आहे.
विक्रम मुंडे धनंजय नागरगोजे यांच्या मृत्यूला जबाबदार
धनंजय नागरगोजे यांच्या मृत्यूला जबाबदार विक्रम मुंडे आहे त्याच्यावर आणि धनंजय नागरगोजे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये जी नावे आहेत त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. वेळीच त्याची मागणी पूर्ण केली असती तर ही वेळ आली नसती. विक्रम मुंडे च्या संस्थेत अशाच प्रकारे शिक्षकांचा छळ केला जात असल्याची माहिती पुढे येत आहे यासाठी ‘मराठी महाराष्ट्र’ आवाज उठवत राहील.
मात्र धनंजय नागरगोजे यांच्या मृत्यूला कारणीभूत विक्रम मुंडे असल्याने पुन्हा दुसरा धनंजय होऊ नये यासाठी. धनंजय नागरगोजे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ज्या ज्या लोकांचा उल्लेख केला आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी जनसामान्यांची मागणी आहे.
धनंजय नागरगोजे यांची महाराष्ट्राला रडणारी पोस्ट जशास तशी
श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही
बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही .कधी मी कुणाला दोन रू ला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही .
श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे .तुला आजुन काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला लवागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे
,विजय विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
आणि
त्यांचे कार्य करते
उमेश रमेश मुंडे
गोविंद नवनाथ आव्हाड
ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे
या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे .मला हे
हाल हाल करून मरणार आहेत
मला मारण्याचं करणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की ,मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय अजून मला
पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली
आणि तीतून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सूर्वात केली
श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे.
तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो.
काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकणी ठेवला नाही .
बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही
श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लयकीचो नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला
विक्रम बाबुराव मुंडे
विजयकांत विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
उमेश रमेश मुंडे
ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे
गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड
हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत .कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवित आहे
आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे.
सर्वांना माझा शेवटचा राम राम