बीड : सध्या सतीश भोसले नावाचा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी हा माध्यमांच्या रडारवर आहे त्याला दोन दिवसांत माध्यमांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले आहे.
मेन स्ट्रीम मीडियावर दोन दिवस झाले दुसरी बातमी नाही. खोक्या कोणाचा समर्थक? खोक्या काय खातो? खोक्या काय करतो? खोक्या झोपला खोक्या पळाला, खोक्या फरार आहे असे विविध प्रकाराचे मनघडन बातम्यांचे रिपोर्ट दाखवल्याने पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अशा बातम्यांमुळे तपासला अडथळा निर्माण होत असून अशा चुकीच्या बातम्या दिल्याने पोलिसांची दिशाभूल होत असल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत.
सतीश भोसले याने अनेक हरिणांची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे त्यामुळे वातावरण तापले आहे.
अशातच आता ऐका फेसबुक पोस्टवर tv चॅनेल वाल्यांनी बातम्या करायला सुरुवात केली आहे.
सध्या सोशलमिडियावर लॉरेन्स बिश्नोई या फेसबुक खात्यावरुन सतीश भोसलेला अटक करा मी त्याला सजा देणार आहे. मात्र त्याला अटक करा अशी मागणी केली असल्याचे पोस्टद्वारे सांगत त्यावर बातम्या केल्या जात आहेत. मात्र ही पोस्ट खरच लॉरेन्स बिश्नोई ची आहे का? याची कुठलीही खात्री न करता बातम्या केल्या जात आहेत. ज्या पोस्टचा आधार घेऊन बातम्या केल्या जातात ती पोस्ट बारकाईने वाचली तर ती पोस्ट साध्या मराठी भाषिक व्यक्तीने हिंदीत लिहिल्याचे स्पष्ट समजते कारण त्यातील केलेले शब्दप्रयोग हे अत्यंत चुकीचे आहेत.

त्यातील मचकूर हा अर्धा मराठी आहे अर्धा हिंदीत आहे त्यामुळे ती पोस्ट खोटी आहे की खरी आहे माहित नाही किंवा मग कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे दिसते. आणि विशेष म्हणजे लॉरेन्स बिश्नोई हा सध्या जेलमध्ये आहे तो कसा फेसबुक चालवू शकतो? हा मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे ही पोस्ट महाराष्ट्रातील व्यक्तीने केली असावी खास करून ती पोस्ट बीड मधील व्यक्तीने केल्याचा संशय येत आहे कारण बीडमधील वातावर इतके तापले आहे की माध्यमांना तीन महिन्यांपासून खजाना मिळाला आहे आणि आता तो त्यांना सोडण फार जड जात आहे त्यामुळे अशा बातम्या माध्यमं करत आहेत असे दिसते.
खरंतर अशा चुकीच्या बातम्या दिल्याने पोलिस संभ्रमावस्थेंत आहेत असे म्हणावे लागेल.
बीड पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांनी या पोस्टची कसून चौकशी करावी आणि जाने कुणी ही पोस्ट केली आहे त्याचा तपास पोलिसांनी घ्यावा अशी जनतेतून मागणी केली जात आहे.