बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी लाटण्याचा आरोप करणारी पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी घेतली. सुरेश धसांवर गंभीर आरोप त्यांनी केलेत मनोज जारंगेंना धोका दिला, ते महायुतीमध्ये असताना आमची काम अडवतात, आष्टीकरांची काम अडवतात त्यामुळे विकास कामाला अडथळा निर्माण झाला. त्याचबरोबर ज्या वाल्मीक कराडच्या विरोधात आज सुरेश धस बोलत आहेत त्याच वाल्मीक करडांनी सुरेश धसांचे काम केलं असल्याचं बाळासाहेब आजबे म्हणाले.
मागील विधानसभा काळातील पाच वर्षांमध्ये २०१९ ते २०२४ आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार म्हणून कार्यरत असणारे हेच बाळासाहेब आजबे होते त्या पाच वर्षांमध्ये बाळासाहेब आजबे यांनी नेमके काय दिवे लावले? याची पत्रकार परिषद अगोदर बाळासाहेब आजबे यांनी घ्यावी.
पाच वर्षापूर्वी सुरेश धस यांनी जमिनीचा घोटाळा केला हे का नाही सांगीतले? बाळासाहेब अजबे आष्टीवरून पाटोद्याला कधी गेला नसाल तर जा आणि मग तुमचे माकड हाड नाही दुखले तर पुन्हा सांगा.
- मनोज जरंगे यांनी अजबेना पत्रकार परिषद घ्यायल लावली का?
कारण त्यांनी उल्लेख केला की मी जरांगे यांना सांगितले होते की सुरेश धस तुमच्या आंदोलनाकडे आले तर अडचण होईल आणि तसेच झाले. बर असो आंदोलन सोडून महिना होत आहे तेव्हाच का नाही म्हणाले जरांगेला धसांनी धोका दिला म्हणून? जरांगे यांना सुरेश धस यांची भूमिका लक्षात आली आहे असे अजबे म्हणाले आहेत. मग मनोज जरंगे यांनीच आजबे यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली असे समजायचे का? कारण जरंगे आणि आजबे यांची तळमळ एकसारखी आहे हे लक्षात आले आहे.
जर आपण असं समजलं की बाळासाहेब आजबे अजित पवार गटाचे नेते आहेत आणि ते धनंजय मुंडे यांची बाजू घेण्यासाठी सुरेश धस यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत आहे किंवा मग ते आष्टी मधल्या भ्रष्टाचाराबाबत पत्रकार परिषद घेत आहे मात्र मागील पाच वर्षात ही पत्रकार परिषद का घेतली नाही? हा एक सवाल आहे. आणि दुसरा मुद्दा ते वाल्मीक कराड आणि सुरेश धस हे एकच आहेत असं म्हणतात आणि असे म्हणणे हे वाल्मीक कराड यांच्या विरोधात आहेत आणि वाल्मीक कराड यांना विरोध म्हणजे धनंजय मुंडे यांना विरोध. त्यामुळें ही पत्रकार परिषद ना धनंजय मुंडे यांच्या फायद्याचे आहे ना अजित पवारांची आहे ना पक्षाच्या फायद्याची आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद केवळ त्रयस्थ कोणत्यातरी एखाद्या माणसाने घ्यायला लावलेली आहे ज्याचा सुरेश धसांचे खच्चीकरण झाल्यानंतर ज्यांना फायदा होईल ती दोन नावे समोर दिसतात ती म्हणजे पंकजा मुंडे आणि मनोज जरंगे या दोघांना फायद्या होणार आहे.
बाळासाहेब आजबे यांनी सुरेश धस यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याबद्दल चौकशी व्हावी सत्यता बाहेर यावी आणि राहिला विषय सरपंचाच्या ऑडिओ क्लिप चा तर तेव्हा धनंजय देशमुख यांचा खून झालेला नव्हता तेव्हा वाल्मीक कराड हे बाळासाहेब अजबे यांच्यासाठीही वाल्मीक आण्णाच होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यांनाही विसरता येणार नाही.
तेव्हा तुमचे आणि वाल्मीक कराड यांचे संबंध नव्हते का? आजही नाहीत का? हे बाळासाहेब आजबे यांनी जाहीर करावे, आणि त्याबरोबरच धनंजय मुंडे यांचेही माझ्याशी काही संबंध नाहीत हे ही त्यांना सांगावे लागेल कारण वाल्मीक कराड हे माझेच समर्थक आहेत हे धनंजय मुंडे यांनी जाहीर सांगितलेलं आहे तसे आजबे यांनी आहेत किंवा नाही हेही सांगावे.पाच वर्ष सत्तेत राहून जनतेने त्यांना घरचा रस्ता का दाखवला याचे उत्तर सुद्धा बाळासाहेब आजबे यांनी द्यावे.
दरम्यान संतोष देशमुख खून प्रकरण, मराठा आरक्षण हे दोन-तीन मुद्दे सोडून मतदार संघात काय योजना आणल्या किती विकासकामे केली यावर त्यांनी एकदा पत्रकार परिषद घ्यावी. खरंतर बाळासाहेब आजबे यांची आजची पत्रकार परिषद ही संतोष देशमुख यांच्या न्याय हक्क प्रकरणाला कुठेतरी पायबंद घालणारी आहे. कारण आजची पत्रकार परिषद पाच वर्षांपूर्वी किंवा अडीच वर्षांपूर्वी घेणं गरजेचं होतं. आज पर्यंत तुम्ही का गप्प बसले? हा सगळ्यात मोठा सवाल आहे याचाच अर्थ बाळासाहेब आजबे यांना कुणीतरी ही पत्रकार परिषद घ्यायला लावलेली आहे. त्यांना आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचा फार कळवळा असता तर त्यांनी पाच वर्षांमध्ये आष्टी पाटोदा शिरूरचा अर्ध्या अधिक समस्या सोडवल्या असत्या ज्या सोडवलेल्या नाहीत.