गेवराई : विधानसभा मतदारसंघांमध्ये नवा ट्वीस्ट आला आहे, दोन टर्म विधानसभा सदस्य असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार लक्ष्मण पवार यांनी यावेळी म्हणजेच २०२४ ची निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतला, त्यावरून समर्थकांनी लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या मांडला.
लक्ष्मण पवार यांनी बाहेर येत पंधरा दिवसात आपला निर्णय कळवू अशा प्रकारचे आश्वासन दिले त्यानंतर समर्थकांनी हा ठिय्या मागे घेतला. पवार निवडणूक का? लढणार नाहीत हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. मराठी महाराष्ट्रच्या अंदाजानुसार लक्ष्मण पवार यांना त्यांच्या कुटुंबांमधून विरोध होत असल्याने लक्ष्मण पवार यांना निवडणूक लढण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे लक्ष्मण पवार यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हणता येईल.
दुसरीकडे लक्ष्मण पवार यांच्या निवडणुकीतून माघार घेण्याने अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, बदामराव पंडित यांना मोकळं रान झालय का? असा सवाल उपस्थित झाला आणि त्यानंतर लक्ष्मण पवार यांनी सांगितलं की गेवराई मध्ये कुठलाही पंडित पुन्हा संधी साधणार नाही याची काळजी घेतली जाईल. मग लक्ष्मण पवार नेमकं करणार काय आहेत? हा सवाल उपस्थित झाला आहे.
लक्ष्मण पवार यांच्या समर्थकांकडून पवार यांना विनंती केली जात आहे की तुम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करा आणि निवडणुक लढवा मात्र तूर्ताश लक्ष्मण पवार यांनी कुठलाही निर्णय घेण्यास नकार दिला आहे त्यामुळे पवार यांचा नेमका प्लॅन काय आहे यावरून मतदार संघात चर्चा रंगली आहे.
पवार तुतारी गटात जातील का? काय फायदा होईल?
लक्ष्मण पवार हे निवडणूक लढणार नाहीत मग त्यांचा मतदार कुठे जाणार? जरी लक्ष्मण पवार आज कोणताही पंडित निवडूण येऊ देणार नाही असे म्हणत असले तरी निवडूण कोणाला देणार ? हा सवाल आहेच मग ते मयुरी खेडकर यांना मदत करतील का? पूजा मोरे यांना मदत करतील का? आपला पुतण्या शिवराज ला रणांगणात उभा करतील का? असे अनेक प्रश्न आहेत.
अमरसिंग पंडित हे त्यांचे कौटुंबिक आणि राजकीय विरोधक आहेत त्यामूळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते काहीही करू शकतात एकवेळ ते बदामराव पंडित यांना सहकार्य करू शकतात पण पंडितांना रान मोकळे सोडणार नाहीत.
गेवराई मतदार संघात अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या मयुरी बाळासाहेब मस्के -खेडकर यांची मतदारसंघांमध्ये चांगली ओळख झालेली आहे लक्ष्मण पवार यांनी निवडणुकीमधून माघार घेतल्यानंतर पंडित यांना न मानणारा, पवारांना मानणारा मतदार वर्ग हा मयुरी खेडकर यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मयुरी खेडकर यांना तिथं फार मोठं सहकार्य होऊ शकतं. मात्र लक्ष्मण पवार काय नेमका निर्णय घेतात याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेवराई चां मतदार सध्या प्रस्थापित विरुद्ध विस्थापित चेहरा शोधत आहेत त्यामुळे नव्या चेहर्याकडे लक्ष जाऊ शकते त्यात पूजा मोरे, मयुरी खेडकर यांना सुद्धा पसंती दिली जाऊ शकते.